Share

फडणवीस आणि अजित पवार शेजारी बसले म्हणून सरकार होणार नाही – प्राजक्त तनपुरे

Published On: 

🕒 1 min read

पिंपळगाव बसवंत- पिंपळगाव बसवंत येथे शेतकऱ्यांच्या वीज प्रश्नासंदर्भात वीज वितरण मंडळाच्या बैठकीला ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे उपस्थित होते. त्यावेळी आज पंतप्रधान मोदी पुणे येथे आले असता कार्यक्रम प्रसंगी देवेंद्र फडणवीस व अजित पवार हे दोघे शेजारी शेजारी बसले होते..? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. यावर तनपुरे म्हणाले की, शेजारी बसले म्हणून सरकार बनेल असे काही नसते. सध्या तरी राजकीय भूकंप होणार नाही. समोरच्याने कितीही  प्रयत्न केले, कितीही त्रास दिला तरी महाविकास आघाडीचे सरकार पडणार नाही. हे सरकार पाच वर्षे टिकणार आहे. त्यामुळेच विरोधकांना माझी विनंती आहे की लोकशाही पद्धतीने सरकार चाललं पाहिजे. सरकार पाडण्याचे प्रयत्न करण्यापेक्षा लोकांचे प्रश्न मांडण्याकडे जास्त लक्ष द्यावे. तरच कदाचित ते पुन्हा सत्तेत येऊ शकतात. पण जर फक्त सरकार पाडण्यात वेळ घालवला तर पुढचे कित्येक वर्षे पुन्हा सत्तेत येणे अवघड होईल.

…म्हणून लोडशेडिंग नाही 
मागच्या काही दिवसांपूर्वीच लोडशेडिंगची वेळ कदाचित आली असती. परंतु महानिर्मिती कंपनी तसेच महावितरण कंपनी, थोडक्यात संपूर्ण ऊर्जा खात्याने अत्यंत तारेवरची कसरत करून लोडशेडिंगची वेळ येऊ दिली नाही. परंतु हे सगळे विषय लोकांसमोर येत नाहीत. पंधरा-पंधरा ,वीस-वीस रुपये युनिट एवढ्या महाग दराने मार्केटमधून वीज खरेदी करून  हे लोडशेडिंग आपण होऊ दिलेलं नाही. मागच्या पावसाळ्यात काही कोळसा कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांचे आंदोलन झाले. त्यातच आंतरराष्ट्रीय बाजारात कोळशाचे भाव वाढले परंतु तरीही महावितरण कंपनीने आणि महानिर्मिती कंपनीने मोठ्या कौशल्यानं राज्यावरील लोडशेडिंगचे संकट टाळलेले आहे आणि भविष्यात देखील आपण हे संकट येणार नाही याची काळजी आपण घेतली आहे. तसेच कोळसा पुरविण्यासाठी केंद्र सरकार कमी पडले, असेही ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे म्हणाले.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!