Share

“…या पुढे तुमची उडी कधी गेलीच नाही रोहितजी”, अतुल भातखळकरांचा टोला

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) काल (६ मार्च) पुणे दौऱ्यावर होते. पुणे मेट्रोसोबत पुण्यातील इतरही अनेक उपक्रमांच्या उद्घाटनासाठी ते पुण्यात आले होते. यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना ते या प्रकल्पासाठी नेहमीच दिल्लीला येत असतं. ते या प्रकल्पाच्या पाठिशी लागलेले असायचे.असे म्हणत त्यांनी भाजपला श्रेय दिले. मात्र यावरूनच राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांनी ट्वीट करत भाजपला आरसा दाखवला होता. तर रोहित पवारांच्या (Rohit Pawar) ट्वीटलाच आता भाजप नेते अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

“प्रस्ताव तयार करणे आणि घोषणा करणे या पुढे तुमची उडी कधी गेलीच नाही रोहितजी. मेट्रो प्रकल्प तडीस कोणी लावला हे जनता जाणून आहे. मुंबईत मेट्रो प्रकल्पाची वाट लावणाऱ्या तुमच्या सरकारची कुवतही माहीत आहे सगळ्यांना.”, असे खोचक ट्वीट करत अतुल भातखळकर यांनी रोहित पवारांना टोला लगावला आहे.

रोहित पवारांचे ‘ते’ ट्वीट-

रेटून ‘फेकणं’ ही भाजपची नेहमीची सवय असली तरी लोकांची दिशाभूल होऊ नये म्हणून आणि खोटारड्या भाजपाला आरसा दाखवण्यासाठी ‘मेट्रो प्रवासा’चा हा इतिहास…२००९ ला पुणे व पिंपरी महापालिकेत राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाची सत्ता असताना मेट्रोचा प्रस्ताव तयार करण्यात आला. असे ट्वीट करत रोहित पवारांनी भाजपवर निशाणा साधला होता.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!