Share

मग तुम्ही मेट्रोतून फिरून का आलात? गिरीश महाजनांचा शरद पवारांना सवाल

Published On: 

🕒 1 min read

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना भाजपने सडेतोड उत्तर दिले आहे.शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुणे दौऱ्यावरून टोलेबाजी केली याला संबोधून शरद पवारांना गिरीश महाजन यांनी उत्तर दिले.

‘पंतप्रधानांच्या आगमनामुळं पुणं भाजपमय आणि मोदीमय झालं आहे” त्यामुळं पवारांना वाईट वाटलं असेल. त्यातूनच ते असं बोलताहेत, असे उत्तर भाजप नेते गिरीश महाजन यांनी दिले आहे. युक्रेनमधील विद्यार्थ्यांना सोडवून आणण्यासाठी केंद सरकारने प्राधान्य दिले पाहिजे, परंतु मोदी सर्व कामे आर्ध्व्त करत आहे असे शरद पवार आजच्या पत्रकार परिषदेत बोलले. हे आरोप गिरीश महाजन यांनी खोडून काढले व सडेतोड उत्तर दिले आहे.

केंद्र सरकारने युक्रेनमधील विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यसाठी पुरेपूर प्रयत्न करत आहे. दररोज भारतात २-३ फ्लाईट येत आहेत. आमचे ४ कॅबिनेट मंत्री युद्धाच्या अगदी जवळ गेले आहेत. विद्यार्थ्यांशी बोलण होत आहे, त्यांची विचारपूस केली जाते. केंद्र सरकार काहीच करत नाही असे दाखविण्याचा केविलवाणा प्रयत शरद पवार करत आहेत. तसेच त्यांचा मेट्रोशी काडीमात्र संबंध नाही तरीही ते मेट्रोमध्ये फिरून का आले? मी किती चांगलं काम करतोय हे दाखवण्याचा प्रयत्न पवार साहेबांनी केला आहे. अशी सडेतोड टीका गिरीश महाजन यांनी केली.

महत्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!