🕒 1 min read
- [contact-form][contact-field label=”Name” type=”name” required=”true” /][contact-field label=”Email” type=”email” required=”true” /][contact-field label=”Website” type=”url” /][contact-field label=”Message” type=”textarea” /][/contact-form]
मुंबई : सध्या नैसर्गिक शेती वाढविण्याची जबाबदारी कृषी विद्यापीठांवर सोपविलेली आहे. असे असताना आता शेतकऱ्यांना दिलासा मिळणार निर्णय केंद्राने घेतला आहे. आता वाणिज्य मंत्रालयाच्या निर्यात प्राधिकरणाने नैसर्गिक शेतीच्या माध्यमातून उत्पादित मालाची निर्यात करून एक बाजारपेठ मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहे. केंद्राच्या या धोरणाचा शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.
शेतीचे महत्व वाढविण्यासाठी कृषी विभाग आणि निर्यात विकास प्राधिकरण या दोन विभागामध्ये या संदर्भात चर्चा झाली आहे. खाद्यपदार्थ, सौंदर्यप्रधाने आणि औषधांची मागणी मोठ्या प्रमाणात असते त्यामुळे अपेडा कृषी उत्पादनांच्या निर्यातीला चालना देण्यासाठी धोरण तयार केले जाणार आहे.
नैसर्गिक शेतीचा शेतकऱ्यांना फायदा –
मिळालेल्या उत्पादन निर्यातीला मान्यता मिळाली तर थेट शेतकऱ्यांना आर्थिक फायदा होणार आहे. उत्पादक, निर्यातदार तसेच विविध राज्य सहकारी अधिकारी आणि इतर भागधारक याच्या गरजा भागविल्या जाणार आहेत. यासाठी अपेडाने हा उपक्रम हाती घेतला आहे.
महत्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
