Share

“…त्यांची सुद्धा चौकशी झाली पाहिजे”, फोन टॅपिंग प्रकरणावर अमोल मिटकरींची प्रतिक्रिया

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : माजी पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) यांच्यावर फोन टॅपिंग केल्याचा आरोप असून यासंदर्भात तत्कालीन पोलीस महासंचालक संजय पांडे यांची समिती नेमण्यात आली होती. याच समितीने राज्य शासनाला अहवाल दिल्यानंतर शासनाने दिलेल्या आदेशानुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, हे प्रकरण पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले असून या मुद्द्यावरून राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी याविषयी भाष्य केले आहे.

यासंदर्भात ट्विट करत अमोल मिटकरी म्हणाले आहेत की,‘आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी खा. संजय राऊत आणि एकनाथराव खडसे यांचे फोन टॅप केले हे महाराष्ट्राच्या समोर आले आहे. अशा अधिकाऱ्यांना दोनच व्यक्ती आदेश देऊ शकतात एक मुख्यमंत्री दुसरे गृहमंत्री. ही खाती ज्यांच्याकडे होती त्यांची सुद्धा चौकशी झाली पाहिजे’, असे मिटकरी म्हणाले आहेत.

दरम्यान, याप्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी देखील प्रतिक्रिया दिली असून यासंदर्भात प्रसार माध्यमांशी संवाद साधत असतांना राऊत म्हणाले की,‘माझे फोन अजूनही टॅप केले जात असून तरीही मी माझा फोन नंबर बदललेला नाही, फोन टॅपिंगचा हा महाराष्ट्र पॅटर्न देशभर राबवला जात आहे.’ तसेच राज्यात सत्ता आणायची असेल तर राज्यपाल, फोन टॅपिंग, केंद्रीय तपास यंत्रणा आदींच्या माध्यमातून राजकारण केले जाते. इतके करूनही सत्ता येत नसेल तर KGB, CIA या यंत्रणांना आणावे लागेल, असेही राऊत म्हणाले.

महत्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!