Share

“पुणे जसं शिक्षणाचं माहेर घर आहे तसं युक्रेन…”; शरद पवारांनी सांगितल्या जून्या आठवणी

Published On: 

🕒 1 min read

पुणे : रशिया युक्रेनच्या युद्धात अडकलेल्या विद्यार्थ्यांना सोडविण्यासाठी केंद्र सरकार पुरेपूर प्रयत्न करत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणतात की, भारतातले काही विद्यार्थी परत आणले त्यासाठी आपण काय केलं? त्यापेक्षा जे विद्यार्थी अडकले आहेत त्यांच्यासाठी काय करायला हवं? हा विचार आपण करायला हवा. असा पुण्यातील पत्रकार परिषदेत बोलताना सल्ला दिला आहे.

युक्रेनमध्ये बरेच विद्यार्थी अडकलेली आहेत. माझा त्यांच्याशी संवाद होत आहे. त्यांच्यासमोर अनेक समस्या आहेत. संकटात कुणी काय केलं याची चर्चा नको, अडकलेल्यांना सोडवण्यासाठी प्रयत्न हवेत, विद्यार्थ्यांसमोरील समस्या जाणून घेऊन. मार्ग काढणे गरजेचे आहे. असेही सांगितले.

“विद्यार्थ्यांशी बोलणं झालं आहे. देशाच्या दुतावासाने युक्रेनच्या सीमेच्याबाहेर येता येईल, 5 ते 6 तास चालावं लागेल इतक्या अंतरावर सीमा आहे. जाण्यासाठी आम्ही तयार आहोत परंतु भयंकर थंडी आहे आणि त्यात गोळीबार सुरू असतो. अशामध्ये जायचं कसं असे विद्यार्थी बोलत आहेत. यावर काहीतरी मार्ग काढला जाईल असेही शरद पवार यांनी सांगितले.”

शरद पवार यांनी युक्रेनला भेट दिल्याची माहिती आज या पत्रकार परिषदेत दिली. युक्रेन हा चांगला देश आहे. मी 2 ते 3 वेळा गेलो होतो. पुणे शिक्षणाचं माहेर घर आहे तसाच युक्रेन सुद्धा शिक्षणाचं माहेर घर म्हणून ओळखल जातं.

महत्वाच्या बातम्या – 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!