🕒 1 min read
पुणे: रशिया युक्रेनच्या युद्धामुळे युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना भारतात परत आणण्याचे काम सुरूच आहे. यातच आता युक्रेनमध्ये अडकलेल्या पुण्यातील विद्यार्थ्यांना सुरक्षितरित्या मायदेशी परत आणण्यात आले. हे विद्यार्थी पुणे शहर आणि जिल्ह्यातील रहिवाशी आहेत. एकूण १६ विद्यार्थ्यांचे शनिवारी रात्री १.३० वाजता पुणे विमानतळावर आगमन झाले. यावेळी भाजप पुणे शहर पदाधिकारी उपस्थित होते. तसेच यावेळी गिरीश खत्री मित्र परिवाराच्या वतीने विद्यार्थ्यांचे पुष्पहार घालून आणि पेढे वाटून स्वागत करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांचे कुटुंबीय सुद्धा हजर होते.
या विद्यार्थ्यांचा शिवाजी महाराजांची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला. काही पालकांनी आपल्या मुलांसाठी केक आणला होता तो कापून विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी आनंद व्यक्त केला. आपल्या मुलांना एवढ्या मोठ्या संकटातून जीव मुठीत धरून सुखरूप आलेले पाहून कुटुंबियांना अश्रू अनावर झाले होते. यावेळी विद्यार्थ्यांनीही कुटुंबियांच्या समवेत हा आनंदाचा क्षण अनुभवून आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली.
महत्वाच्या बातम्या:
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
