Share

केळी उत्पादक होणार आता मालामाल; शेतकरी मित्रांनो हा दुहेरी फायदा वापरून पहाच..

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : सध्या केळीची तोडणी सुरु आहे. शेती केळी शेतीतून दुहेरी फायदा घेऊ शकतात. केळी उत्पादक शेतकरी केळीपासून पावडर बनवू शकतात. या पावडरीतून शेतकरी व्यवसाय करून मालामाल होऊ शकतात. असे शेतकऱ्यांना दुहेरी फायदा होऊ शकतो. केळीपासून तयार करण्यात येणाऱ्या पावडरीला मागणी जास्त आहे. यातून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढ शकते. केळी पावडरीचे मार्केटिंग होणे गरजेचे आहे असे फलोत्पादन विभागाचे शास्त्रज्ञ डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी सल्ला दिला आहे.

अशी बनवा पावडर –

१) सर्वात आधी हिरव्या केळी फळांना सोडियम हायपोक्लोराइट द्रावण 10 ग्रॅम द्या आणि सायट्रिक अॅसिड हे 1 ग्रॅम हे 1 लिटर पाण्यात टाकून केळी 5 मिनिटे बूडवून ठेवा.

२) केळीचे 4 मीमी जाडीचे तुकडे करा. व द्रावणात पुन्हा बुडवा पुढे केळीचे काप 60 डिग्री सेल्सियस पर्यंत कोरडे होण्यासाठी ओव्हनमध्ये 24 तास ठेवा. सर्व तुकडे संपूर्ण वाळायला हवे.

३) त्यानंतर मिक्सरमध्ये केळीचे तुकडे बारीक करुन घ्या. बारीक पावडर करा. तयार होणारी पावडर पॉलिथिलीनच्या पिशव्या, शिशाच्या बाटल्यांमध्ये पॅक करून 20- 25 अंश सेल्सिअसच्या तापमानात ठेवा. अशा प्रकारे तुमची पावडर तयार असेल. अशा पद्धतीने बनवून शेतकरी दुप्पट पैसा कमवू शकतो.

केळीच्या पावडरीचे फायदे –

केळीची पावडर ही मधुमेहींसाठी उत्तम तसेच त्वचेसाठी उपयुक्त, पचनशक्ती मजबूत करणे, हृदयाची काळजी घेण्यासाठी, वजन कमी करणे आणि वाढवणे या दोन्हीसाठी उपयोगी आहे.

महत्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!