🕒 1 min read
मुंबई: महाराष्ट्र विधीमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिनेशन आजपासून सुरू झालं आहे. यात सर्वात महत्त्वाचं म्हणजे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून विरोधकांनी सरकारला चांगलंच घेरलं आहे. भाजपानं आक्रमक भूमिका घेतली असल्याचे दिसत आहे. तसेच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दाऊदला समर्थन देणाऱ्या मंत्र्याचा राजीनामा घेतलाच पाहिजे, अशी मागणी केली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नवाब मलिक यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी भाजपाच्या नेत्यांनी यावेळी केली. मुख्यमंत्र्यांनी हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे जर असते तर एका मिनिटांत त्यांना काढून टाकलं असतं. कारण मुंबईसोबत त्यांनी गद्दारी केली आहे. ते मुंबईचे अपराधी आहेत. ज्यांनी मुंबई बॉम्बस्फोट घडला त्यांच्याकडून फक्त जमीनच नाही घेतली, तर ५० लाख रुपये हसीना पारकरला दिला. दाऊदच्या बहिणीला पैसे देणं याचा अर्थ काय?, असा सवाल देखील फडणवीस यांनी उपस्थित केला आहे.
महत्वाच्या बातम्या:
-
Gangubai Kathiawadi : ‘गंगुबाई’ सुसाट… पाच दिवसात तब्बल ५५ कोटी रुपयांची केली कमाई
-
“भाजप आमदारांच्या बेशिस्तपणामुळे राज्यपालांना सभागृह सोडावे लागले”, जयंत पाटलांची टीका
-
सुप्रीम कोर्टाच्या निकालावर वडेट्टीवारांची प्रतिक्रिया; म्हणाले…
-
Russia-Ukraine War: रशियन रोमन अब्रामोविचने चेल्सी फुटबॉल क्लब विक्रीसाठी ठेवला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
