🕒 1 min read
मुंबई: ओबीसी आरक्षणासंदर्भात सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली असून मागासवर्ग आयोगाने जो अहवाल सादर केला होता तो अहवाल सुप्रीम कोर्टाने नाकारला आहे. त्यामुळे आता सुप्रीम कोर्टाच्या पुढील निर्देशांपर्यंत निवडणुकीत ओबीसी आरक्षण लागू करता येणार नाही. यावरूनच भाजप नेते राम सातपुते यांनी ठाकरे सरकारवर (Ram Satpute criticizes Thackeray government) टीका केली आहे.
“जेवढ्या तळमळीने राज्य सरकारचे मंत्री वसुली करतात त्याऐवजी तेवढीच तळमळ ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नात दाखवली असती तर ओबीसींची राजकीय हानी टळली असती.”, असा खोचक टोला राम सातपुते यांनी लगावला आहे.
जेवढ्या तळमळीने राज्य सरकारचे मंत्री वसुली करतात त्याऐवजी तेवढीच तळमळ ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नात दाखवली असती तर ओबीसींची राजकीय हानी टळली असती. @OfficeofUT @Dev_Fadnavis@BJP4Maharashtra
— Ram Satpute (@RamVSatpute) March 3, 2022
दरम्यान भाजपने आता ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका होऊ नये, अशी मागणी केली आहे. तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारने आता तरी गंभीर व्हावे. पण ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घेण्याला आमचा तीव्र विरोध असेल. यासाठी कोणताही संघर्ष करावा लागला तरी आम्ही तो करू. भाजपा ओबीसी समाजाच्या पाठीशी भक्कमपणे उभी राहील. असा इशारा दिला आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा ओबीसी आरक्षणावरून भाजप- मविआ असा संघर्ष पेटला आहे.
महत्वाच्या बातम्या:
-
“भाजप आमदारांच्या बेशिस्तपणामुळे राज्यपालांना सभागृह सोडावे लागले”, जयंत पाटलांची टीका
-
सुप्रीम कोर्टाच्या निकालावर वडेट्टीवारांची प्रतिक्रिया; म्हणाले…
-
Russia-Ukraine War: रशियन रोमन अब्रामोविचने चेल्सी फुटबॉल क्लब विक्रीसाठी ठेवला
-
माजी क्रिकेटपटूचे मोठे विधान, ‘या’ खेळाडूला तीन नंबरला संधी द्या
- “नागराजने संधी दिली तर…”; झुंड पाहील्यानंतर आमिर खानचे मोठ वक्तव्य
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
