नागपूर : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेत ठाकरे सरकारवर जोरदार निशाणा साधला. देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकार महाज्योती बंद पाडण्याच्या प्रयत्नात असल्याचा आरोप केला आहे. एका बाजूला महाज्योती साठीची आर्थिक तरतूद दिली जात नाही तर दुसऱ्या बाजूला ओबीसी मंत्री आंदोलन करण्यात व्यस्त आहेत, असे फडणवीस म्हणाले.
दरम्यान, बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांनी देवेंद्र फडणवीसांवर जोरदार पलटवार केला आहे. “आम्ही मरेपर्यंत महाज्योती बंद होऊ देणार नाही उलट यावर्षी महाज्योतीचे बजेट वाढवून घेणार आहोत.”, असे वडेट्टीवार म्हणाले.
यावेळी बोलताना विजय वडेट्टीवार यांनी किरीट सोमय्यांना देखील टोला लगावला आहे. किरीट सोमय्यांबद्दल बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांना विचारले असता, थेट त्यांच्या तोंडाला झाकण राहिलेले नाही. बोलण्यात काहीही अर्थ नाही अशी सडेतोड टीका केली.
महत्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
