Share

“दाऊदशी व्यवहार करणाऱ्याला वाचवण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरु”, फडणवीसांचा दावा

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना दाऊद इब्राहीमच्या नातेवाईकांबरोबर केलेल्या आर्थिक व्यवहारप्रकरणी अटक करण्यात आली आहे. यावरूनच भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Leader of Opposition Devendra Fadnavis) यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.

“नवाब मलिक यांना अटक झाल्यापासून संपूर्ण ठाकरे सरकार मलिकांच्या पाठीशी उभे ठाकले आहे. ज्यांनी दाऊदला सहकार्य केले त्याला वाचवायला सरकार उभे राहिले आहे. देशात असे कधीच झाले नाही की, पोलीस कस्टडी मध्ये असतानादेखील मंत्रीपदावर व्यक्ती कायम आहे. एकप्रकारे राज्यघटनेचा अवमान हे सरकर करत आहे.” असा आरोप फडणवीस यांनी केला आहे.

ज्या सरकारचे प्रमुख शिवसेनेचे नेते आहेत, ते सरकार मुंबईच्या खुन्यांसोबत व्यवहार करणाऱ्या पाठींशी उभे आहे, ही अतिशय दुर्दैवी बाब आहे. मात्र आम्ही नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी कायम धरणार आहे. त्यामुळे भाजप ठामपणे राजीनामा झाला पाहिजे, यासाठी सभागृहात संघर्ष करेल. असा इशाराही देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!