🕒 1 min read
मुंबई: बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला मोठा दिलासा मिळाला आहे. कॉर्डेलिया क्रूझवर झालेल्या ड्रग्ज पार्टीमध्ये आर्यन खानकडे कोणतेही अमली पदार्थ नव्हते, (Aryan Khan had no drugs) असं एनसीबीने (NCB) स्थापन केलेल्या विशेष चौकशी समितीच्या तपासाअंतर्गत समोर आले आहे. त्यामुळे आर्यन खानचा कोणत्याही मोठ्या ड्रग रॅकेटशी संबंध नाही असे समितीने म्हटले आहे.
याच मुद्द्यावरून आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. तसेच भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर देखील त्यांनी टीका केली आहे. आर्यन खानच्या बाबतीत तुम्ही बनाव केलात, असाच बनाव तुम्ही आमच्या बाबतीत केला आहे. आता तुमच्या प्रत्येकाचे मुखवते उतरवल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा संजय राऊत यांनी दिला आहे.
महत्वाच्या बातम्या:
-
मोठी बातमी! आर्यन खानचा कोणत्याही मोठ्या ड्रग रॅकेटशी संबंध नाही; चौकशीत उघड
-
‘त्या’ रेडमध्ये भाजपचा पदाधिकारी पंच म्हणून सामिल; सचिन सावंत यांचा गंभीर आरोप
-
“गर्जेल तो पडेल काय? उगाच टीमक्या,डायलॉगबाजी अन्…”, भातखळकरांचा राऊतांन टोला
-
“आज विकास सोडून सर्व प्रकारचं केवळ राजकारण होतंय”, रोहित पवारांनी साधला भाजपवर निशाणा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
