🕒 1 min read
नवी दिल्ली: जीएसटी संकलनात गेल्या वर्षीच्या तुलनेत तब्बल १८ टक्क्यांनी वाढ झाली आहे. ( GST collection increased by 18% over last year) याबाबत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ट्वीट करत माहिती दिली आहे. फेब्रुवारी २०२२ साठी एकत्रित GST महसूल १,३३,०२६ कोटी रुपये इतका जाहीर करण्यात आला आहे.
दरम्यान जीएसटी संकलनाने १.३० लाख कोटी रुपयांचा टप्पा ओलांडण्याची ही पाचवी वेळ आहे. तसेच फेब्रुवारी २०२० च्या तुलनेत संकलन २६ टक्क्यांनी वाढले आहे. तसेच फेब्रुवारी महिन्यात आयातीतून महसुलात ३८ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
“Revenues for the month of February 2022 18% higher than the GST revenues in the same month last year and 26% higher than the GST revenues in February 2020.”#GST https://t.co/K59yn5FWEr
— Nirmala Sitharaman (@nsitharaman) March 1, 2022
दरम्यान पहिल्यांदाच जीएसटी सेस संकलन १०,००० कोटी रुपयांच्या पुढे गेले आहे. कारण ऑटोमोबाईल क्षेत्रातून रिकव्हरी परत आल्याची माहिती मिळत आहे. अशी माहिती अर्थ मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.
महत्वाच्या बातम्या
- …तर मुख्यमंत्र्यांना शंभर टक्के पाठिंबा देऊ- आशिष शेलार
- IPL 2022: इंग्लंडच्या दिग्गज फलंदाजाची आयपीएल हंगामातून माघार, कारण…
- ‘या’ तारखेला उघडणार केदारनाथचे दरवाजे; महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर जाहीर
- ‘वरनभात लोन्चा कोण नाय कोन्चा चित्रपटसारखी संजय राऊतांची अवस्था’ – आशिष शेलार
- दीपा कर्माकर धक्कादायक रित्या कारण न सांगताच FID कडून सस्पेंड
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
