Share

“…वजनाचं आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशन भारतावर पाडायचं का?”, रशियाने दिली अमेरिकेला धमकी

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली: रॉसकोमोसचे प्रमुख दिमित्रि रोगोजिन यांनी ट्विटरवरुन अमेरिकेला धमकी दिली आहे. (Russia threatens US) रशियन अंतराळ संस्था रॉसकोमोसचे प्रमुख असलेले दिमित्रि रोगोजिन (head of the Russian space agency Roscomos Dmitry Rogozin) यांनी अमेरिकेने लादलेल्या निर्बंधांचा परिणाम आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनसंदर्भातील कार्यांवर होऊ शकतो असे म्हटले आहे.

“जर तुम्ही आमच्यासोबतच्या सहकार्यावर निर्बंध आणत असाल तर आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनला वाटेल त्या भ्रमणकक्षेत फिरण्यापासून कोण वाचवणार. ते अमेरिका किंवा युरोपमध्ये पडणार नाही का?” असा सवाल या ट्वीट मध्ये केला आहे. तसेच ५०० टन (५ लाख किलो) वजनाची ही वस्तू भारत किंवा चीनवर पडू शकते. तुम्हाला या शक्यतेने त्यांना धमकवायचे आहे का? आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशन रशियावरुन जात नाही, त्यामुळे सर्व धोका तुम्हालाच आहे. तुम्ही यासाठी तयार आहात का? असा इशाराही रशियाने दिला आहे.

दरम्यान अमेरिकेने रशियन सत्ताधाऱ्यांच्या निकटवर्तीयांवर तसेच रशियन बँकांवर निर्बंध आणले आहेत. त्यानंतर रॉसकोमोसचे प्रमुख दिमित्रि रोगोजिन यांनी ट्वीट करत अमेरिकेला इशारा दिला आहे. मात्र या ट्वीटमध्ये भारताचा उल्लेख असल्याने अप्रत्यक्षपणे भारतालाही रशिया-युक्रेन युद्धात ओढले जात असल्याचे म्हटले जात आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!