🕒 1 min read
मुंबई: नवी मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्ह्याध्यक्ष अशोक गावडे (Ashok Gawade) यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे. त्यामुळे भाजपने आक्रमक भूमिका घेत याला विरोध केला आहे. भाजपच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी अशोक गावडे यांनी आपल्या वक्तव्याबाबत माफी मागावी अन्यथा तुम्हाला नवी मुंबईत महिला फिरू देणार नाहीत, अशा इशारा दिली आहे.
नेमके काय म्हणाले होते अशोक गावडे?
वाशी येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकात नवाब मालिकांवर ईडी ने केलेल्या कारवाई विरोधात आंदोलन चालू होते. यावेळी मुंबईतील महाविकास आघाडीच्या विविध मुख्य पदाधिकाऱ्यांची भाषणे झाली. मात्र राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अशोक गावडे भाषण करत असताना त्यांची जीभ घसरली.
“आमच्या कोणत्याही मुख्यमंत्र्यांची पत्नी अशा पध्दतीने कोठेही टीका करत नाही. परंतु ही डान्सबारमधली मात्र रस्त्यावर येऊन बोलते”, असे आक्षेपार्ह वक्तव्य गावडे यांनी केले. मुख्यमंत्री किंवा मुख्यमंत्र्यांच्या धर्मपत्नीने कशा प्रकारचे वक्तव्य केले पाहिजे असेही ते म्हणाले. यानंतर भाजपने मात्र आक्रमक भूमिका घेत याला विरोध केला आहे.
मंदा म्हात्रे यांचा इशारा-
अशोक गावडे यांनी निदर्शने करताना अपशब्द वापरले ते तोंडातही घेतले जाऊ शकत नाही. नवी मुंबईकरांच्या वतीने आम्ही त्यांचा निषेध करतो. महिलांना अपशब्द वापरणे आपल्या कोणत्या संस्कृतीत आणि संस्कारात बसते, हे त्यांनी लोकांना सागितले पाहिजे. उद्या आम्ही त्यांच्याविरुद्ध पोलिस ठाण्यात तक्रार देणार आहोत. त्यांच्यावर अनेक गुन्हे असतानाही आज ते नवी मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आहेत. असे मंदा म्हात्रे यांनी म्हटले आहे. तसेच त्यांच्या तोंडाला जर काळे फासले नाही, तर मी नावाची मंदा म्हात्रे नाही, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
महत्वाच्या बातम्या:
- युक्रेन-रशिया युद्धात चीनची उडी; शी जिनपिंग पुतीन यांना फोन करत म्हणाले…
- ‘तृतीय पंथीयांच्या उपचारासाठी स्वतंत्र वार्ड संबंधी आराखडा तयार करण्याचे निर्देश’ – राजेश टोपे
- भारताने एकतर्फी सामना जिंकला ; कर्णधार रोहित मात्र खेळांडूवर भडकला
- ‘भ्रष्टाचाराची प्रकरणे उघडे पडण्याची भीती असल्यानेच…’ विखे पाटलांची महाविकास आघाडीवर टीका
- रिद्धिमान साहा होऊ शकतो सस्पेंड; बीसीसीआय संघ निवडी विषयी आरोपांवर प्रश्न विचारणार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
