🕒 1 min read
अकोला : पालकमंत्री बच्चू कडू जनता दरबारी पोहोचले आहेत. अर्थातच अकोला जिल्ह्यात सिंचन प्रकल्पांमुळे बाधित गावांमधील नागरिकांचे पुनर्वसन व त्यांना नागरी सुविधा पुरविण्याबाबत जनसंवाद यात्रेत उपाययोजना करण्यात आल्या. या यात्रेत अनेकांच्या तक्रारी आणि त्यांचे प्रश्न सोडवण्याचे काम अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री बच्चू कडू (Bachchu Kadu)यांनी केले.
दरम्यान बच्चू कडून यांनी नायक चित्रपट पाहिला आणि आपणही असंच काहीतरी करू हा निर्धार त्यांनी केला. त्यानंतर त्यांनी हा उपक्रम राबविला. तद्पश्चात स्टॉल लावल्यानंतर गरजू लोकांनी गर्दी केली आणि सर्व नागरिकांची कामेही झाली. यासाठी तहसीलदारांनीही महत्वाची साथ दिली.
— Govind Hatwar (@GovindHatwar) February 25, 2022
दरम्यान पहिल्याच दिवशी पंचेचाळीस हजार तक्रारींचे निवारण झाले. मंत्री बच्चू कडू यांनी या सर्व प्रश्नांचे निराकरण केले. कायदा म्हणतो तीन दिवसांत दाखला द्या. पण, कामाच्या बोज्यामुळं ही कामे होत नाहीत. एक-एक माणूस आल्यास वेळ, पैसा आणि श्रम वाया जातो. त्यातही शेतकऱ्यांना अपमान सहन करावा लागतो. लोकांचा अपमान होऊ नये. त्यासाठी लोकप्रतिनिधी असतात. त्यामुळे लोकप्रतिनिधी म्हणून आमचं कर्तव्य आहे. असे बच्चू कडू यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या:
-
अखेर ठिकाण ठरलं, मनसेचा वर्धापन दिन सोहळा पहिल्यांदाच होणार मुंबईबाहेर
-
मनसेचा अनोखा उपक्रम; मराठी भाषा गौरव दिनानिमित्त एक लाख पोस्ट कार्ड्सचे करणार वाटप
-
VIDEO : अरे…यांचं चाललंय काय? मास्क घालताना शिवसेना नेत्याची झाली फजिती; तुम्हीच पाहा!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
