मुंबई: ज्येष्ठ कवी वि.वा.शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रज यांचा २७ फेब्रुवारी हा जन्मदिवस ‘मराठी भाषा गौरव दिन’ (Marathi Language Pride Day) म्हणून साजरा केला जातो. मराठी भाषेची गौरवशाली परंपरा जपण्यासाठी आणि तिचे संवर्धन करण्यासाठी मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून राज्यभरात हा दिन साजरा केला जातो. याच निमित्ताने मनसेने एक उपक्रम सुरु केला आहे.
मराठी राजभाषा दिनानिमित्त मनसे नवी मुंबईत एक विशेष उपक्रम राबवत आहे. लेखक राहुल साळवे यांनी शब्दबद्ध केलेल्या शुभेच्छा संदेशाला ख्यातनाम सुलेखनकार अच्युत पालव यांनी अक्षररूपात साकारलेली एक लाख पोस्ट कार्ड्स नवी मुंबईकरांना घरोघरी जाऊन महाराष्ट्र सैनिक देणार आहेत.
मराठी राजभाषा दिनानिमित्त मनसे नवी मुंबईत एक विशेष उपक्रम राबवत आहे. लेखक श्री. राहुल साळवे यांनी शब्दबद्ध केलेल्या शुभेच्छा संदेशाला ख्यातनाम सुलेखनकार श्री. अच्युत पालव यांनी अक्षररूपात साकारलेली एक लाख पोस्ट कार्ड्स नवी मुंबईकरांना घरोघरी जाऊन महाराष्ट्र सैनिक देणार आहेत. pic.twitter.com/Kw1m1tGG5g
— MNS Adhikrut – मनसे अधिकृत (@mnsadhikrut) February 25, 2022
या पोस्ट कार्डचे अनावरण आज पक्षाचे नेते अमित ठाकरे (MNS leader Amit Thackeray) यांच्या हस्ते राजगड मुख्यालयात झाले. याप्रसंगी पक्षाचे शहराध्यक्ष गजानन काळे तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते. या अगोदरही मनसेने “आपली भाषा आहे म्हणून आपण आहोत. आपली भाषा आपल्या सर्वांना ओळख देते. त्यामुळेच आपल्या एका महान, गौरवशाली परंपरा असलेल्या मराठी भाषेचा गौरव त्याच जोरदारपणे साजरा झाला पाहिजे. त्यासाठी विविध प्रकारचे कार्यक्रम तुम्हाला आयोजित करता येतील. हे इतक्या जोरदारपणे साजरे करा की तुमच्या भागातल्या प्रत्येक माणसाला कळलं पाहिजे की आज मराठी भाषा गौरव दिवस आहे. त्यात जास्तीत जास्त लोक सहभागी होतील हे पहा. तो जेवढा भव्य करता येईल तितका तो करा. त्यात मराठी भाषेचं पावित्र्य राखा.” अशी पोस्ट केली होती.
महत्वाच्या बातम्या:
‘फडणवीस मुख्यमंत्री असताना का अटक केली नाही?’; नवाब मलिक अटक प्रकरणी हसन मुश्रीफांचा सवाल
नवाब मलिकांची प्रकृती खालावली; जे. जे. रुग्णालयात उपचार सुरु
IPL 2022 : आयपीएलच्या उद्घाटनाची तारीख ठरली ; मैदानावर गर्दीही दिसणार!
राऊतांच्या ‘त्या’ आरोपानंतर नील सोमय्यांची अटक टाळण्यासाठी कोर्टात धाव
संजू सॅमसन विश्वचषक संघात खेळणार?; कर्णधार रोहितची मोठी माहिती


