नवी दिल्ली : रशियन हल्ल्यांमुळे युक्रेनमध्ये विध्वंस होत आहे. ताज्या अपडेटनुसार रशियन सैन्य युक्रेनची राजधानी कीव येथे पोहोचले आहे. यापूर्वी आज कीववर सहा वेळा क्षेपणास्त्र हल्ला झाला होता. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की असहाय्य दिसत असून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बिडेन यांनीही हात वर केले आहेत. यावर झेलेन्स्की यांनी रशियासोबतच्या लढाईत एकटे पडल्याचे म्हटले आहे. रशियाच्या हल्ल्यात युक्रेनमधील १३७ लोक मारले गेले आणि ३१६ जण जखमी झाल्याचा दावा त्यांनी केला.
या पार्श्वभूमीवर युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना देखील गंभीर परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. यामध्ये विद्यार्थ्यांचा समावेश आहे, हे विद्यार्थी चांगलेत घाबरले असून ते आपला जीव वाचवण्यासाठी मेट्रो रेल्वे स्थानकात लपून बसले आहेत. युक्रेनमधील मेट्रो स्टेशनवरून व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये भारतीय विद्यार्थी घाबरलेले दिसत आहेत. तर दुसऱ्या व्हिडिओमध्ये एक भारतीय विद्यार्थी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना लवकरात लवकर तेथून बाहेर काढण्याची विनंती करत आहे.
मनीष जयस्वाल या विद्यार्थ्याने त्याच्या अपार्टमेंटमध्ये शूट केलेला एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात ते म्हणत आहेत की आम्ही लाचार आहोत. सकाळपासून शहरात तीन-चार बॉम्बस्फोट झाले आहेत. आमच्याकडील वस्तू संपत चालल्या आहेत. हवाई मार्ग बंद आहेत. मी पंतप्रधान नरेंद्र मोदी जी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना विनंती करतो की त्यांनी भारतीयांना लवकरात लवकर बाहेर काढण्याची व्यवस्था करावी. जयस्वाल युक्रेनमध्ये वैद्यकीय शास्त्र शिकत असून तो मूळचा बलिया, यूपीचा आहे.
दुसऱ्या एका भारतीयाने पाठवलेल्या व्हिडिओमध्ये लोक भूमिगत मेट्रो रेल्वे स्टेशनच्या जमिनीवर बसलेले दिसत आहेत. पश्चिम युक्रेनमधील टेर्नोपिलमध्ये शिकणाऱ्या नीलेश जैनने हा व्हिडिओ शूट केला आहे. नीलेश जैन यांच्या म्हणण्यानुसार, ते जवळपास ३० तास मेट्रो स्टेशनवर अडकले आहेत. जैन म्हणाले की, येथे इंटरनेट कनेक्शन चांगले नाही. बॉम्बचा स्फोट झाल्याचा आवाज आपल्याला ऐकू येत असले. आम्हाला मदत करा. मी पंतप्रधान मोदीजींना आवाहन करतो की, आम्हाला येथून लवकर बाहेर काढा.
युक्रेनमध्ये अडकलेल्या गुजरातमधील एका भारतीय विद्यार्थ्याने कु वर एक व्हिडिओ पोस्ट केला असून, एटीएम आणि दुकानांमध्ये लांबच लांब रांगा आहेत आणि प्रत्येकजण घाबरलेला आहे. ज्या विद्यार्थ्यांनी भारतातील फ्लाइटचे तिकीट काढले होते ते घरी जाऊ शकले नाहीत. कारण युक्रेनचे हवाई क्षेत्र बंद करण्यात आले आहे.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

