🕒 1 min read
मुंबई: भारताला अंडर १९ जिंकून देणाऱ्या यश धुलने दिल्लीसाठी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे. ज्यात धुलने गुवाहाटी येथे तामिळनाडूविरुद्धच्या रणजी ट्रॉफी सामन्यात शानदार शतक ठोकले आहे. यासह यश , सचिन तेंडुलकर, अमोल मुजुमदार, रोहित शर्मा आणि इतर अनेक दिग्गजांचा समावेश असलेल्या रणजी ट्रॉफी पदार्पणात शतक नोंदविणाऱ्या भारतीय खेळाडूंच्या प्रतिष्ठित यादीत सामील झाला आहे.
दिल्लीसाठी सलामीला पाठवलेल्या यश धुलने अवघ्या १३३ चेंडूत १६ चौकारांच्या मदतीने शतक पूर्ण केले. सामन्यात तामिळनाडूने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ९७ धावांवर असताना एम मोहम्मदने धुलला बाद केले पण चेंडू नो-बॉल ठरला आणि दिल्लीच्या युवा फलंदाजाला दिलासा मिळाला. त्यानंतर यशने शानदार खेळी करत शतक पूर्ण केले.
???????????????? ???? ????????????????????????! ???? ????
???? on Ranji Trophy debut! ???? ????
This has been a fantastic batting performance from Yash Dhull in his maiden First Class game. ???? ???? @Paytm | #RanjiTrophy | #DELvTN | @YashDhull2002
Follow the match ▶️ https://t.co/ZIohzqOWKi pic.twitter.com/uaukVSHgUq
— BCCI Domestic (@BCCIdomestic) February 17, 2022
यश धुलने भारताला विक्रमी पाचव्या वेळेस अंडर १९ विश्वचषकात विजय मिळवून दिला होता. तसेच त्यानंतर मेगा ऑक्शनमध्ये यश धूल दिल्ली संघात गेला आहे. यंदा रणजी करंडक स्पर्धा दोन टप्प्यात होणार आहे. यात प्री-आयपीएल टप्पा १० फेब्रुवारी ते १५ मार्च या कालावधीत चालेल. तर आयपीएलनंतरचा टप्पा ३० मे ते २६ जून या कालावधीत चालेल. रणजी ट्रॉफी या मोसमात ६२ दिवसांत ६४ सामने खेळवले जाणार आहेत.
महत्वाच्या बातम्या
- भारताने सामना जिंकला मात्र कर्णधार रोहित नाराज
- “तपास यंत्रणांचा उपयोग राजकारणासाठी…”, बाळासाहेब थोरातांचा संजय राऊतांना पाठिंबा
- राजकीय कार्यक्रमांना जल्लोष! शिवजयंतीला का नाही? सरकारचे शिवजयंती विरोधी धोरण
- संजय राऊतांच्या आरोपांवर किरीट सोमय्यांची प्रतिक्रिया; म्हणाले…
- विलियम्सच्या लहान मुलीसोबत फोटो शेअर करत वॉर्नरने केली भावनिक पोस्ट
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
