🕒 1 min read
मुंबई: आज ४ वाजता शिवसेनेची पत्रकार परिषद होणार आहे. तत्पूर्वी मुंबईतील अनेक ठिकाणी ईडीकडून धाडी टाकण्यात येत आहेत. डॉन दाऊद इब्राहिम संदर्भातील प्रकरणामध्ये या धाडी टाकण्यात येत असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे राज्यात राजकीय वर्तुळात सध्या याच्याच चर्चा रंगत आहेत. यावरच आता शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut reaction to ED action in Mumbai) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
“माझ्याकडे यासंदर्भात माहिती नाही. जर राष्ट्राच्या सुरक्षेबाबत काही विषय असतील, काही गंभीर गोष्टी असतील आणि केंद्राकडे तशी काही माहिती असेल तर केंद्रीय तपास यंत्रणांना सहकार्य करणं गरजेचं आहे. यासंबंधी आपण जास्त बोलू नये. कारवाई सुरु असेल तर राज्य आणि केंद्र सरकराने एकत्रित काम करायला हवं,” असे राऊत यांनी म्हटले आहे.
तसेच यामध्ये काही राजकीय नेत्यांच्या नावाचा उघड होत असल्याचेही म्हटले जात आहे. यावरच संजय राऊत यांनी म्हटले आहे की, “मला माहिती नाही. नावं समोर येतील की घुसवली जातील हा महाराष्ट्र, पश्चिम बंगाल आणि छत्तीसगडमध्ये मोठा प्रश्न आहे. त्याच्यावर मी सध्या काही बोलणार नाही. राष्ट्रीय सुरक्षा, एकात्मता हा नाजूक आणि गंभीर विषय असतो. तपास सुरु असताना त्यावर जास्त बोलण्याची गरज नाही.” मात्र गुजरातमध्ये देशातील सर्वात मोठा बँक घोटाळा झाला आहे. ईडी तिथे कधी जाणार याची वाट पाहत आहोत. दोन वर्षांपासून हा घोटाळा दाबण्याचा कोणी प्रयत्न केला? एफआयआरदेखील होऊ दिला नाही. ईडीने तिथेही जाऊन ते लोक कोण होते, आरोपींना पळून जाण्यास मदत करणारे कोण? यासंदर्भात तपास करायला हवा. असेही राऊत यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या:
- “अंगावर आलात तर शिंगावर घेऊ…”, प्रवीण दरेकरांचा नाना पटोलेंवर निशाणा
- “…तर सर्वात आधी धनंजय मुंडेंना तुरुंगात टाकलं असतं”, करुणा शर्मांचा धक्कादायक खुलासा
- “भ्रष्टाचाराचे शेण खाल्ल्यावर हे नशिबी येतेच”, ‘त्या’ घटनेवरून भातखळकरांचा ठाकरे सरकारवर निशाणा
- “मुख्यमंत्र्यांना शिवजयंती उत्सवावर संख्येचे बंधन घालताना जनाची नाही तर मनाची तरी…?”, भातखळकरांचा टोला
- “शाख़ों से टूट जाएँ वो पत्ते नहीं हैं हम…” संजय राऊतांचा विरोधकांना इशारा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
