🕒 1 min read
मुंबई: काल (१४ फेबृवारी ) कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या ‘सागर’ बंगल्यावर आंदोलन छेडले होते. (Congress agitation) मात्र पोलिसांनी त्यांना त्यांच्या घरासमोरील गेटवरच अडवले. तर दुसरीकडे भाजपकडूनही रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. नंतर मात्र नाना पटोले यांनी आंदोलन मगे घेतल्याची भूमिका घेतली. यावरच आता विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Leader of Opposition Praveen Darekar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
“आपण काय चांगली कामं केली हेच मविआ सरकारला दाखवता येत नाही आणि त्यामुळे ते आपले अपयश झाकण्यासाठी केंद्र सरकार-राज्य सरकार, राज्यपाल-राज्य सरकार असा भावनिक वाद व संघर्षाचे वातावरण निर्माण करून लोकांचे लक्ष मूळ प्रश्नांपासून विचलित करण्याचा प्रयत्न करीत आहेत.”, असा आरोप प्रवीण दरेकर यांनी केला आहे.
आपण काय चांगली कामं केली हेच मविआ सरकारला दाखवता येत नाही आणि त्यामुळे ते आपले अपयश झाकण्यासाठी केंद्र सरकार-राज्य सरकार, राज्यपाल-राज्य सरकार असा भावनिक वाद व संघर्षाचे वातावरण निर्माण करून लोकांचे लक्ष मूळ प्रश्नांपासून विचलित करण्याचा प्रयत्न करीत आहेत. (1/3) pic.twitter.com/Edq0o3VJst
— Pravin Darekar – प्रविण दरेकर (@mipravindarekar) February 15, 2022
तसेच नाना पटोले म्हणतात, “मला मुंबईकरांना त्रास नको म्हणून आंदोलन मागे घेतो.” म्हणजे आता उपरती झाली का आपल्याला? काल आंदोलनाचे आव्हान देताना हा विचार का आला नाही? जर चाल करून भाजपवर कुणी येणार असेल आणि तुमचा समज असेल की, तरीदेखील आम्ही शांत बसायचं? अंगावर आलात तर शिंगावर घेऊ ही जेव्हा अॅक्शनला रिअॅक्शनची भूमिका घेतली त्यावेळी जमीनीवर आले. असा टोला प्रवीण दरेकर यांनी लगावला आहे.
महत्वाच्या बातम्या:
- “भ्रष्टाचाराचे शेण खाल्ल्यावर हे नशिबी येतेच”, ‘त्या’ घटनेवरून भातखळकरांचा ठाकरे सरकारवर निशाणा
- “मुख्यमंत्र्यांना शिवजयंती उत्सवावर संख्येचे बंधन घालताना जनाची नाही तर मनाची तरी…?”, भातखळकरांचा टोला
- “शाख़ों से टूट जाएँ वो पत्ते नहीं हैं हम…” संजय राऊतांचा विरोधकांना इशारा
- भाजपचे गंडांतर पाहूनच लोकशाहीच्या संरक्षणासाठी मविआ सरकारची स्थापना-सचिन सावंत
- “अण्णांनी महाराष्ट्राचा अपमान गिळला…” ; शिवसेनेची खोचक टीका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
