Share

IPL AUCTION 2022: दिल्लीची ‘नवीन टोली’ स्पर्धा करणार काबीज

Published On: 

🕒 1 min read

बंगळूरू: IPL 2022 मेगा ऑक्शनमध्ये दिल्ली कॅपिटल्स सर्वात व्यस्त संघापैकी एक होते कारण ते यावेळी अनेक मोठ्या नावांच्या मागे गेले होते. त्यांनी यावेळी अनेक स्टार खेळाडूंना आपल्या संघात सामील केले आहे. दिल्ल्ली कॅपिटल्सने ऑक्शनपूर्वी ऋषभ पंत, अक्षर पटेल, पृथ्वी शॉ आणि अॅनरिक नॉर्टजे यांना रिटेन केले होते. ४७.५ कोटीच्या बजेटसह दिल्ली कॅपिटल्स मेगा ऑक्शनमध्ये उतरली होती.

दिल्लीने मोठ्या नावांमध्ये सर्वात पहिले डेव्हिड वॉर्नरला केवळ ६. २५ कोटी रुपयांमध्ये संघात दशकानंतर परत आणली. वॉर्नर हा आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी फलंदाजांपैकी एक आहे. यानंतर त्यांनी ऑस्ट्रेलियाचा मिचेल मार्शला ६. ५ कोटी रुपयांनाखरेदी केले. दरम्यान,सर्वात महागडी खरेदी शार्दुल ठाकूर होती. कॅपिटल्सला त्याच्यासाठी तब्बल १०. ७५ कोटी रुपये खर्च करावे लागले. दिल्लीने चेतन साकारिया, मुस्तफिजुर रहमान, कमलेश नागरकोटी आणि खलील अहमद यांना गोलंदाजी मजबूत करण्यासाठी खरेदी केले. भारताचा अंडर-१९ विश्वचषक विजेता कर्णधार यश धुलही दिल्लीत आहे.

दिल्ली कॅपिटल्सचा संघ : पृथ्वी शॉ, एनरिक नॉर्टजे, ऋषभ पंत (कर्णधार), अक्षर पटेल, डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, शार्दुल ठाकूर, मुस्तफिझूर रहमान, कुलदीप यादव, अश्विन हेब्बर, सरफराज खान, कमलेश नागरकोटी, केएस भरत, मनदीप सिंग, खलील अहमद, चेतन सक्रिया , ललित यादव, रिपल पटेल, यश धुल, रोवमन पॉवेल, प्रवीण दुबे, लुंगी एनगिडी, टिम सेफर्ट, विकी ओस्तवाल

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!