🕒 1 min read
मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत(Sanjay Raut) यांच्यावर भाजप नेते किरीट सोमय्या(Kirit Somaiya) यांनी गंभीर आरोप लावले असून वाईन व्यवसाय, तसेच पुण्यातील जम्बो कोविड घोटाळा यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांचे निकटवर्तीय यांना निशाण्यावर धरले आहे. यालाच उद्या म्हणजेच १५ फेब्रुवारी रोजी शिवसेनेच्या पत्रकार परिषदेत उत्तर देणार असल्याचे संजय राऊतांनी म्हटले आहे. तसेच येत्या काही दिवसांत भाजपचेच साडे तीन लोक अनिल देशमुखांच्या कोठडीत दिसतील, असेही राऊत म्हणाले आहेत. दरम्यान, राऊतांच्या या वक्तव्यावर आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले(Nana Patole) यांनी भाष्य केले आहे.
यासंदर्भात प्रसार माध्यमांशी संवाद साधत असतांना नाना पटोले म्हणाले की,‘संजय राऊत जी पत्रकार परिषद घेणार आहेत, ज्या साडेतीन शहाण्यांबद्दल बोलणार आहेत, त्यांचा पेपर मी आज का फोडू? आज त्या साडेतीन शहाण्यांना झोप लागणार नाहीये, मला माहितीय ते कोण आहेत? पण जरा सस्पेन्स राहु देत. काही दिडशहाणे आहेत, त्यामुळे ते साडेतीन शहाणे आहेत’, असे पटोले म्हणाले.
दरम्यान, जे लोक आम्हाला म्हणतात की, अनिल देशमुख यांच्या कोठडीत तुम्ही काही दिवसांत दिसणार. मात्र येत्या काही दिवसांत भाजपचेच साडे तीन लोक अनिल देशमुखांच्या कोठडीत दिसतील, आणि अनिल देशमुख बाहेर असतील, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या :
- “…याला म्हणतात हात दाखवून अवलक्षण”, भातखळकरांचा हल्लाबोल
- ‘भाजपचे साडेतीन लोक अनिल देशमुखांच्याच कोठडीत असतील’-संजय राऊत
- “शिवसेनेत सूड उगवण्याची नीच प्रवृत्ती…”अतुल भातखळकरांचे टीकास्त्र
- IPL AUCTION 2022: पंजाब किंग्सचा संघ करणार नव्याने सुरुवात!
- “नाना पटोले नौटंकीबाज, …कॉंग्रेसनेच माफी मागावी”, देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
