Share

“काही लोकांना भुंकण्याची सवय असते”, संजय राऊतांची किरीट सोमय्यांवर अप्रत्यक्ष टीका

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: भाजप नेते किरीट सोमय्या (BJP leader Kirit Somaiya) यांनी पुण्यातील जम्बो कोविड सेंटर मध्ये शिवसेना खासदार संजय राऊत आणि त्यांचे निकटवर्तीय तसेच मुख्यमंत्री ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी मिळून भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला आहे. यावरच आज (१३ फेब्रुवारी) पत्रकारांशी संवाद साधताना संजय राऊत (Shiv Sena MP Sanjay Raut) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

अगोदर त्यांच्यावर एफआयआर दाखल करा-

“काही लोकांना भुंकण्याची सवय असते. त्यामुळे त्यांना भुंकू देत. महाराष्ट्र शासनाचे कोरोना काळातील कार्याचे जगभरात कौतुक झाले आहे. त्यांना आरोपच करायचे असतील तर यूपीतील गंगा नदीत जेव्हा हजारो प्रेत पाण्यात वाहत होती, त्याचे परीक्षण करावे. कोरोना लाटेत अशी परिस्थिती होती, जेव्हा लोक एकमेकांना हाथ लावायला घाबरत होती. अशा वेळी ठाकरे सरकारमधील काही लोक पुढे आली. त्यामुळे कोरोना संकटात आम्ही पुढे होतो. त्यामुळे आरोप आणि कारवाई करायची असेल तर यूपीतील, गुजरातमधील परिस्थितीवर अगोदर परीक्षण करावे.”, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

“…तर पोटावर उपचार करू”

तसेच आमच्यावर आरोप करणारे जे फाईल घेऊन फिरत आहेत, त्यांनी यूपीतील गंगा नदीत जेव्हा प्रेते वाहत होती, त्यांच्यावर एफआयआर दाखल करावीत. त्यामुळे तुमच्याही फाईली तयार आहेत. तेव्हा कळते फाईलमध्ये काय असते. कोरोना काळात राज्याच्या मुख्यमंत्र्यांचे जगभरात कौतुक झाले आहे. हेच तुमच्या पोटात दुखते, असे असेल तर पोटावर उपचार करू. तसेच १५ तारखेला शिवसेनेची पत्रकार परिषद असून त्यापूर्वी काय फाईली दाखवायच्या त्या, दाखवाव्या. १५ तारखेला ४ वाजता शिवसेनेची पत्रकार परिषद होणार, आणि त्यानंतर महाविकास आघाडी सरकारची पत्रकार परिषद होणार.” असा इशाराही संजय राऊत यांनी दिला आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!