🕒 1 min read
मुंबई: शिवसेना खासदार संजय राऊत (Shiv Sena MP Sanjay Raut) यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (BJP state president Chandrakant Patil) यांना खोचक शब्दांत टोला लगावला आहे. “दादा फार निष्पाप ,स्वच्छ मनाचे आहेत, त्यामुळे त्यांच्या त्या वेदना आहेत. बरेच प्रयत्न झाले सरकार पाडण्याचे पण सरकार पडत नाही. त्यामुळे त्यांचे ते फ्रस्ट्रेशन आहे.”, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
दरम्यान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पाच राज्यांच्या निवडणुकांचा निकाल जाहीर झाल्यानंतर म्हणजे १० मार्चनंतर महाराष्ट्रात राजकीय भूकंप होईल. १० मार्चनंतर महाविकासआघाडी सरकारला सत्ता सोडावी लागेल. कारण ठाकरे सरकारमधील मंत्री एकापाठोपाठ तुरुंगाच्या दिशेने जात आहेत. असे म्हटले होते. यावरच संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
” चंद्रकांत पाटील यांना फ्रस्ट्रेशन आले आहे. आता १० मार्च नंतर पाच राज्यांच्या निवडणुका येतील मग ते सरकार पडेल. या अगोदर पश्चिम बंगालच्या निवडणुका होत्या. मात्र काही झाले नाही. त्यांचे प्रयत्न त्यांनी विविध माध्यमातून सुरु ठेवावे. ईडी , सीबीआय अशा माध्यमांतून त्यांनी आपले प्रयत्न सुरु ठेवावेत.”, असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे. “हमको गिराते गिराते खुद गिर गये. चंद्रकांत पाटील यांच्यावर काय बितले , ते मला ठाऊक आहे. ते एक चांगले व्यक्तिमत्व आहे. त्यामुळे मी त्यांची वेदना समजू शकतो. सध्या आम्हाला सत्तेतून पाडण्याचा प्रयत्न सुरु आहे. मात्र आम्ही पडणार नाही. असा इशाराही संजय राऊत यांनी दिला आहे.
महत्वाच्या बातम्या:
- “माणुसकी हाच खरा धर्म”, अनावश्यक मुद्द्यांवरून वाद घालणाऱ्यांनी हे समजून घ्यावं- रोहित पवार
- IPL AUCTION 2022: ‘चेरी ऑन द टॉप’; दीपक चहर ठरला इतिहासातील सर्वात महागडा गोलंदाज
- पंतप्रधान मोदीजी, हे भाजपचे संस्कार आहेत का?- चंद्रशेखर राव
- Hijab controversy: हिजाब मुद्द्यावरून कर्नाटकातील भाजप आमदाराला जीवे मारण्याचा धमक्या
- IPL AUCTION 2022: आवेश खान ठरला आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा अनकॅप्ड खेळाडू


