Share

“…हे किरीट सोमय्यांच्या लढ्याचे यश आहे”, अतुल भातखळकरांचा कॉंग्रेसला टोला

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: भाजप नेते किरीट सोमय्या ( BJP leader Kirit Somaiya) यांनी काल (११ फेबृवारी ) पुणे महापालिकेला भेट दिली. याठिकाणीच काही दिवसांपूर्वी सोमय्या पायरीवर पडले होते. काल याचठिकाणी पुणे भाजप पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्यांचा सत्कार केला. मात्र यानंतर पुणे शहर काँग्रेस कार्यकर्त्यांनी ही जागा गोमूत्र शिंपडून स्वच्छ केली. आता यावरूनच भाजप नेते अतुल भातखळकर (BJP leader Atul Bhatkhalkar) यांनी कॉंग्रेसला टोला लगावला आहे.

“किरीट सोमय्या यांचा ज्या पायरीवर सत्कार झाला त्या पायरीचे काँग्रेसने गोमूत्र शिंपडून शुद्धीकरण केले. त्यानिमित्ताने काँग्रेसला गोमूत्र पवित्र आहे याची जाणीव झाली. हे किरीट सोमय्या यांच्या लढ्याचे यश आहे. बाकी ED ची कारवाई कशानेच थांबणारी नाही”, असे ट्वीट करत अतुल भातखळकरांनी कॉंग्रेसला टोला लगावला आहे.

दरम्यान पुण्यातील जंबो कोविड रुग्णालयात (Pune Jumbo Hospital scam) संजय राऊत (Shiv Sena MP Sanjay Raut) आणि त्यांच्या निकटवर्तीयांनी घोटाळा केल्याचा आरोप करत किरीट सोमय्या काही दिवसांपूर्वी पुणे महानगरपालिकेच्या आयुक्तांना निवेदन देण्यासाठी गेले होते. मात्र यावेळी त्यांच्यावर शिवसैनिकांकडून धक्काबुक्की करण्यात आली होती. काल पुन्हा एकदा ते याठिकाणी गेले असता, भाजपकडून जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आले.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!