🕒 1 min read
मुंबई: साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुन (South superstar Allu Arjun) आणि रश्मिका मंदना (actress Rashmika Mandana) यांच्या ‘पुष्पा: द राइज’ या चित्रपटातील ‘श्रीवल्ली’ गाणे प्रचंड प्रसिद्ध झाले आहे. त्याची एवढी क्रेझ झाली आहे, की मराठी नंतर आता त्याचे इंग्लिश व्हर्जन व्हायरल (English version of Srivalli song viral) झाले आहे.
डच गायिका एम्मा हिस्टर्सने (Dutch singer Emma Histors) हे इंग्लिश व्हर्जन गायले आहे. अवघ्या काही दिवसांत या गाण्याला २६ लाख व्ह्यूस मिळाले आहेत. या गाण्याच्या नवीन व्हर्जनबद्दल पुष्पाचे संगीत दिग्दर्शक देवी श्री प्रसाद यांनी स्वतः त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर माहिती दिली आहे. त्यांनी या गायिकेचे कौतुकही केले आहे.
Loved this????❤️????
Hey @sidsriram bro,I told U when we recorded,lets do an English version 4 Fun,but here’s a lovely cover by @emmaheesters ????????????
May be we shud do our version too???? @alluarjun @aryasukku @javedali4u @boselyricist @adityamusic @TSeries https://t.co/9K3qAD4o1H
— DEVI SRI PRASAD (@ThisIsDSP) February 5, 2022
दरम्यान पुष्पा चित्रपटातील ‘श्रीवल्ली’ गाणे तसेच अल्लू अर्जुन आणि रश्मिकाची जोडी, अभिनय आणि डायलॉग प्रचंड फेमस झाले आहे. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने धुमाकूळ घातला आहे. विशेष म्हणजे चित्रपटातील अल्लू अर्जुनच्या पुष्पा या भूमिकेने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. अल्लू अर्जूनच्या हटके स्टाईलने आजवर अनेकांना भुरळ घातले असून बऱ्याच सेलिब्रिटींनी यावर व्हिडीओ देखील शेअर केले आहेत.
पाहा व्हिडिओ-
महत्वाच्या बातम्या:
- आंदोलन करण्यापेक्षा वर्गात बसण्यात विद्यार्थ्यांचा फायदा – कर्नाटक उच्च न्यायालय
- आदित्य ठाकरे चालवत असलेली गाडी इलेक्ट्रिक होती की पेट्रोल-डिझेलची?- आशिष शेलार
- वाघ गोव्यात दाखल! किशोरी पेडणेकरांचे ट्वीट चर्चेत
- महाराष्ट्राचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांचा कोरोना बाबतीत मोठा खुलासा
- जालन्यात नात्याला काळीमा फासणारी घटना; दीरानेचं केला वाहिनीवर बलात्कार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
