गोवा: राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे ( State Environment Minister Aditya Thackeray)यांची गोव्यात सभा सुरु आहे. शिवसैनिकांकडून त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Mumbai Mayor Kishori Pednekar) ही याठिकाणी उपस्थित असून त्यांनी आदित्य ठाकरेंचे स्वागत करत ‘वाघ गोव्यात दाखल’ झाल्याचे म्हटले आहे.
दरम्यान आदित्य ठाकरे यांची सध्या वास्कोत सभा असून मग ते पेडण्यात जातील.तसेच उद्या मुख्यमंत्र्यांचा मतदारसंघ साखळीत त्यांची सभा असून म्हापसामध्येही ते सभा घेणार आहेत. यावेळी शिवसैनिकांचा मोठा उत्साह येथे दिसून येत आहे.
वाघ गोव्यात दाखल!@AUThackeray ji#AadityaThackeray ji #GoaElections2022 #InAUTweTrust pic.twitter.com/DMdEvD26dU
— Kishori Pednekar (@KishoriPednekar) February 11, 2022
दरम्यान उद्या आदित्य ठाकरे यांच्या हस्ते शिवसेनेचा वचननामा प्रसिद्ध होणार आहे. तर गोव्यातील प्रत्येक मतदारसंघाचे प्रश्न वेगळे असल्यामुळे आम्ही वेगवेगळा जाहीरनामा प्रसिद्ध करण्याचा निर्णय घेतल्याचं शिवसेना नेते संजय राऊत (Shiv Sena MP Sanjay Raut) यांनी स्पष्ट केलं. यावेळी “कोकणीची जतनाय करूया, धनुष्यबाणाक साथ दिवया” असे युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी म्हटले.
महत्वाच्या बातम्या:
- …हा प्रकल्प संपूर्ण देशाच्या प्रगतीसाठी मैलाचा दगड ठरेल- नितीन गडकरी
- IND vs WI : खो गये रन कहाँ! विराटच्या बॅटला सूर गवसेना
- पुणे महानगरपालिकेत राष्ट्रवादीमध्ये आघाडीसाठी बिघाडी
- Uttarakhand Assembly Election 2022: ‘सबमें डालो फूट, मिलकर करो लूट’ हाच कॉंग्रेसचा फॉर्मूला- नरेंद्र मोदी
- Breaking News : बच्चू कडू यांना दोन महिन्यांचा कारावास


