Share

“राऊत साहेब महाराष्ट्राची मान तेव्हाच खाली गेली जेव्हा..”, केशव उपाध्येंचा टोला

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी संसदेतील भाषणात देशात कोरोना स्प्रेडला महाराष्ट्र शासन आणि कॉंग्रेस जबाबदार असल्याचा आरोप केला. यावरच शिवसेना खासदार संजय राऊत (Shiv Sena MP Sanjay Raut) यांनी तीव्र संताप व्यक्त करत मोदींनी राज्याची बदनामी केल्याचे म्हटले. यावर राज्यभरातून प्रतिक्रिया उमटत असताना आता भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये (BJP spokesperson Keshav Upadhye) यांनी ट्वीट करत टीका केली आहे.

महाराष्ट्राचा अपमानाचा मुद्दा संजय राऊत सारखे बोलत आहेत पण राऊत साहेब महाराष्ट्राची मान तेव्हाच खाली गेली जेव्हा राज्य सरकारच्या नाकर्त्यापणामुळे देशात सर्वाधिक कोराना बळी गेले. महाराष्ट्राचा अपमान तेव्हाच झाला जेव्हा राज्याच्या गृहमंत्र्यांवर १०० कोटी खंडणीचे आरोप आयुक्तांनी केले.

तसेच राज्याचा अपमान तेव्हा होतो जेव्हा राज्यात गेल्या दोन वर्षात सर्वाधिक शेतकऱ्यांचा आत्महत्या झाल्या. राज्य सरकारच्या गोंधळामुळे लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात जाते. तेव्हा महाराष्ट्राचा अपमान होत असतो. राज्य सरकारने सतत राज्यातील जनतेचा अपमान केला आहे. देशांतील एकमेव राज्य आहे ज्या राज्याने कोरोना काळात जनतेला कोणतेही पॅकेज दिले नाही. या बद्दल कधी बोलणार? असा सवाल केशव उपाध्ये यांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!