Share

के एल राहुलचे अजब रन आऊट सोशल मीडियावर व्हायरल

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : भारतीय संघने वेस्ट इंडिज संघाला दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात ४४ धावांनी पराभूत करत मालिका २-०ने जिंकली आहे. तसेच भारतासाठी हा सामना खास ठरला कारण त्यांनी विंडीज विरुद्ध सलग १५व्या वर्षी मालिका विजय केला आहे. मात्र सामना संपल्यानंतर सोशल मीडियावर एक वेगळ्याच गोष्टीची चर्चा होत होती. के एल राहूल झालेल्या सामन्यात अजब रीतीने रन आऊट झाल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.

वेस्ट इंडिजने नाणेफेक जिकंत पहिले क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. सुरुवातीलाच भारताच्या तीन विकेट्स लवकर पडल्या. संघ ४३-३ असे असताना केएल राहुल आणि सूर्यकुमार यादव ही जोडी फलंदाजीला आली. दोन्ही फलंदाजांनी आक्रमक पण सावध खेळी करत संघाला सावरले. सूर्या आणि के एलची जोडी भारताला मोठ्या धावसंख्येपर्यंत नेईल असे वाटत असतानाच केएल राहुल रन आऊट झाला. ४८ धावांवर फलंदाजी करणाऱ्या राहुलने बॉल कव्हर्सला खेळला. पहिली धाव पूर्ण केल्यानंतर दुसऱ्या धावांसाठी जाताना ततो अडखळला आणि रन आऊट झाला. त्याचा तो व्हिडीओ नेटकर्यांनी व्हायरल केला आहे.

के एल याआधीच्या सामन्यातही रन आऊटचा भाग होता. त्याच्या सोबत धावणाऱ्या रिषभ पंतला त्यावेळी धावबाद व्हावे लागले होते. या सामन्यात के एल राहुल ४९ वर धावांवर बाद झाल्यानंतर सूर्यकुमारने अर्धशतक केले. सूर्या ६४ वर बाद झाल्यानंतर दीपक हुडाच्या खेळीमुळे भारताने विंडीजवर विजय मिळवला.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!