🕒 1 min read
मुंबई: महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायद्यात बदल करण्याचा निर्णय राज्य सरकार मार्फत घेण्यात आला. बदल केलेल्या विद्यापीठ कायद्यामुळे शिक्षण क्षेत्रात राजकीय हस्तक्षेप वाढणार आहे. राज्य शासनाने केलेल्या या बदलामुळे राज्यातील सर्व शासकीय विद्यापीठांचे कुलपती असणारे मा.राज्यपाल हे कुलगुरूंची थेट नियुक्ती करू शकणार नाही. यापुढे कुलगुरू निवड राज्यशासनाने शिफारस केलेल्या नावांमधूनच मा. राज्यपाल यांना करावी लागेल.
त्याविरोधात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने ‘विद्यापीठ स्वायतत्ता बचाव आंदोलन’ केले आहे. या आंदोलना अंतर्गत अभाविप राज्यभरातील महाविद्यालयात स्वाक्षरी अभियान, तहसीलदार कार्यालयावर धरणे आंदोलन करत आहे. विद्यार्थ्यांनी या स्वाक्षरी अभियानास उस्फुर्त प्रतिसाद देत मोठया प्रमाणात स्वाक्षरी केल्या तसेच कुठल्याही प्रकारचा राजकीय हस्तक्षेप शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रात खपवून घेतला जाणार नाही अशी भावना व्यक्त केली.
विद्यापीठामध्ये कुलपती पदावर प्र.कुलपती म्हणून एक नवीन पद निर्माण करण्यात येणार असून त्या पदी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. ‘महाराष्ट्र विद्यापीठ कायद्यात करण्यात आलेले काळे बदल मागे घेण्यात आले नाही तर हे आंदोलन अजून तीव्र करण्यात येईल आणि विधानभवनावर विद्यार्थ्यांचा विराट मोर्चा धडकेल” असा ईशारा अभाविप कोंकण प्रदेश सह मंत्री योगेश्वर पुरोहित यांनी राज्य शासनाला दिला. या पत्रकार परिषदेस ठाणे महानगर मंत्री शुभम त्रिपाठी , जिल्हा संयोजक रमाकांत मांडकुलकर उपस्थित होते.
महत्वाच्या बातम्या:
- “मुंबईचा दादा शिवसेना आहे”; संजय राऊतांनी भाजपला सुनावले
- IPL 2022 :आयपीएलमधून “या” पाच खेळाडूंनी कमवले आहेत १५० कोटी
- “माझा राजकीय खून करण्याचा प्रयत्न केला जात आहे” जितेंद्र आव्हाडांचा खळबळजनक दावा
- “बालिश आरोप करण्यापेक्षा राऊतांनी न्यायालयात जावे”,अतुल भातखळकरांचा टोला
- एकमेव टी २० सामन्यात भारतीय महिला क्रिकेट संघाचा न्यूझीलँडकडून पराभव
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
