🕒 1 min read
दिल्ली: नाशिक ते पुणे हा प्रवास अवघ्या पावणे दोन तासात पोहोचवणाऱ्या रेल्वे मार्गाचे काम करणाऱ्या प्रकल्पाबाबत केंद्रीय रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानावे, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, खासदार अमोल कोल्हे यांची नवी दिल्लीत चर्चा झाली. सध्या या प्रकल्पाचे काम सुरू असून, हा राज्य सरकारचा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर नाशिक, पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यातून सेमी हाय स्पीड रेल्वे जाणार आहे. या प्रकल्पात पुणे जिल्ह्यातील १ हजार ४७० हेक्टर जमीन संपादित केली आहे.
नाशिक – पुणे सेमी हायस्पीड रेल्वेबाबत नवी दिल्ली येथे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, खासदार अमोल कोल्हे, आमदार रोहीत पवार यांची बैठक झाली. या प्रकल्पाला अधिक गती देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे या भेटीतून समजते. ही बैठक झाल्याची माहिती स्वतः खासदार अमोल कोल्हे यांनी ट्विट करून दिली आहे. आता पुणे नाशिक प्रवास लवकरच दोन तासांचा होणार असून प्रवाशी त्यांची वाट पहात आहेत.
महत्वाच्या बातम्या:
- “मुंबईचा दादा शिवसेना आहे”; संजय राऊतांनी भाजपला सुनावले
- IPL 2022 :आयपीएलमधून “या” पाच खेळाडूंनी कमवले आहेत १५० कोटी
- “माझा राजकीय खून करण्याचा प्रयत्न केला जात आहे” जितेंद्र आव्हाडांचा खळबळजनक दावा
- “बालिश आरोप करण्यापेक्षा राऊतांनी न्यायालयात जावे”,अतुल भातखळकरांचा टोला
- एकमेव टी २० सामन्यात भारतीय महिला क्रिकेट संघाचा न्यूझीलँडकडून पराभव
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
