🕒 1 min read
मुंबई : गानसम्राग्नी, भारतरत्न लता मंगेशकर यांचे आज रविवार दि. ६ फेब्रुवारी सकाळी निधन झाले. वयाच्या ९३ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. लता मंगेशकर यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहेत. मुंबईतील शिवाजी पार्क स्मशानभूमीत आज संध्याकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
भारतरत्न लता मंगेशकर यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी दिल्या आहेत.
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) February 6, 2022
लता मंगेशकर यांचं मुंबईतील ब्रीच कॅंडी रुग्णालयात सकाळी ८.१२ वाजता निधन झालं. दुपारी १२.३० ते ३ वाजेपर्यंत प्रभूकुंज इथं लता दीदींचे पार्थिव अंतिम दर्शनासाठी ठेवलं जाणार आहे. सायंकाळी साडेसहा वाजता शिवाजी पार्क इथं शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. लता मंगेशकर यांच्या निधनानंतर केंद्र सरकारने दोन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे.
त्याच्या निधनाने राष्ट्रध्वज तिरंगा अर्ध्यावर उतरवण्यात आला आहे. लता मंगेशकर यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहेत. बाळासाहेब ठाकरेंच्या अंत्यदर्शनाकरता जशी व्यवस्था शिवाजी पार्कवर करण्यात आली होती. त्याप्रमाणेच शिवाजी पार्कवरदेखील लतादीदींच्या अंत्यदर्शनाकरता व्यवस्था करण्यात येत आहे. महापालिका शिवाजी पार्कात स्टेज उभारत आहे. अंतिमविधी शिवाजी पार्क स्माशानभूमी येथे होणार आहे.
महत्वाच्या बातम्या
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
