🕒 1 min read
मुंबई : ६ फेब्रुवारीपासून भारताची वेस्ट इंडिजविरुद्ध एकदिवसीय मालिका सुरु होणार आहे. भारतीय संघ या पहिल्याच सामन्यात एक इतिहास रचणार आहे. १००० एकदिवसीय सामना खेळणारा भारत हा जगातील पहिला देश ठरणार आहे. भारताला या विक्रमपर्यंत पोहोचायला ४८ वर्षे लागली आहेत. टीम इंडिया १००० वा वनडे खेळणारा पहिला आणि एकूण दुसरा संघ बनेल. इंग्लंडने १०४५ कसोटी सामने खेळले आहेत. भारताने पहिला वनडे सामना १९७४ मध्ये अजित वाडेकर यांच्या नेतृत्वाखाली इंग्लंडविरुद्ध खेळला होता.
भारतीय संघाच्या या ऐतिहासिक सामन्याचे साक्षीदार होण्यासाठी प्रेक्षक उपस्थित राहणार नाहीत. गुजरात क्रिकेट असोसिएशनने यासंबंधी सांगितले की, भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात ६,९आणि ११ फेब्रुवारीला तीन सामने खेळवले जातील. कोविड-१९ महामारीमुळे तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका प्रेक्षकांविना रिकाम्या स्टेडियममध्ये खेळवली जाईल. हे तिन्ही सामने नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहेत.
वेस्ट इंडिज विरुद्धची मालिका विशेष असणार आहे. सगळ्यांच्या नजरा कर्णधार रोहित शर्मावर असणार आहे. वनडेचे कर्णधारपद मिळाल्यानंतर त्याच्या नेतृत्वाखाली ही पहिलीच मालिका असणार आहे. तो हा ऐतिहासिक सामना जिंकूनच नव्हे तर मालिकाही जिंकून चांगली सुरुवात करायची प्रयत्न करेल. दुखापतीमुळेरोहित दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाऊ शकला नाही. जिथे त्याच्या अनुपस्थितीत उपकर्णधार लोकेश राहुलने कर्णधार म्हणून पदभार स्वीकारला होता. मात्र संघाला विजय मिळवता आला नाही. रोहितच्या नेतृत्वाखाली, संघाने आतापर्यंत १० एकदिवसीय सामने खेळले आहेत, त्यापैकी आठ जिंकले आहेत. त्यामुळे रोहितची कर्णधार म्हणून सुरुवात एका ऐतिहासिक सामन्याने होत आहे.
महत्वाच्या बातम्या
- अरेच्चा! शहनाज गिलची ‘ती’ स्टाईल अल्लू अर्जुनने तर केली नाही ना कॉपी?, पहाच व्हिडीओ
- दलितांवर पुन्हा पाण्यासाठी सत्याग्रह करण्याची वेळ आली
- “वापरा आणि फेकून द्या हे भाजपचे धोरण…” एकनाथ खडसेंची टीका
- ओवेसींवर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याचा निषेध; कठोर कारवाई करण्याची खासदार जलील यांची लोकसभेत मागणी!
- यूपीए सरकारने साखर कारखान्यांना कर्ज घेण्यास भाग पाडलं – सुजय विखे पाटील
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
