🕒 1 min read
मुंबई: भाजप नेते तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस(Devendra Fadanvis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस(Amruta Fadanvis) यांनी आज(४ फेब्रु.)पत्रकारांशी संवाद साधताना मुंबईतीत ३ टक्के घटस्पोट वाहतूक कोंडीमुळे होतात, असा गजब दावा केला आहे. त्यांच्या दाव्यानंतर अनेक राजकीय प्रतिक्रिया आता उमटत आहेत. यावरच किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.
“अमृता फडणवीस यांचा तर्क हस्यास्पद असून दरवेळी ऐकावं ते नवल असंच काहीसे बोलत असतात. आता तर त्यांनी जावाई शोध लावला आहे. त्यांच्या या वक्तव्यावर हसावं की रडावं असा प्रश्न मुंबईकरांना पडला आहे”, अशी प्रतिक्रिया किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे.
तसेच मुंबईतील १०० टक्के रस्ते हे गुळगुळीत आहेत असा दावा आम्ही कधीच केला नाही. पण ज्या ठिकाणी समस्या आहेत त्या ठिकाणी कामे करत आहोत आणि करत राहू. तसेच मुंबईकर त्यांच्या या करमणुकीच्या कार्यक्रमाला कंटाळला आता कांटाळले आहेत, असा टोलाही किशोरी पेडणेकर यांनी लगावला आहे.
महत्वाच्या बातम्या:
- “गटबाजी करु नका; तुम्हाला बाळासाहेबांची शपथ”; शिवसेना नेते चंद्रकांत खैरेंचे कार्यकर्त्यांना आवाहन!
- तब्बल २४ वर्षांनी ऑस्ट्रेलिया करणार पाकिस्तान दौरा
- पुण्यातील ‘त्या’ घटनेतील मृतांच्या कुटुंबियांसाठी अजित पवारांनी केली ५ लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर
- Gangubai Kathiawadi Trailer: गंगूबाई काठियावाडीचा ट्रेलर रिलीज, आलियाच्या जबरदस्त लूकने वेधले लक्ष
- अमृता फडणवीसांच्या ‘त्या’ दाव्यावर मनीषा कायंदेंची प्रतिक्रिया म्हणाल्या, “मामींचा नवा शोध..”
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
