Share

सोयगाव नगरपंचायतीमधील ४ सदस्यांचा भाजपला रामराम; शिवसेनेत प्रवेश, सत्तारांचा रावसाहेब दानवेंना झटका!

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद: सोयगाव नगरपंचायत निवडणुकीत आता भाजपला मोठा धक्का बसला आहे. आणि हा धक्का दुसरा तिसरा कोणी नव्हे तर शिवसेनेचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार(Abdul Sattar) यांनी भाजपचे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे(Raosaheb Danve) यांना दिला आहे. नगरपंचायत निवडणुकीत भाजपच्या निवडून आलेल्या सहा सदस्यांपैकी चार सदस्य आता शिवसेनावासी झालेले आहेत. जिल्हाधिकारी यांच्याकडे तशी नोंदणी झालेली आहे.

सोयगाव नगरपंचायत ही अब्दुल सत्तार आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचा मतदारसंघ आहे. नुकतीच झालेली सोयगाव नगरपंचायत निवडणूक दोघांसाठी मोठी प्रतिष्ठेची होती. या आधी भाजपच्या ताब्यात असलेल्या या नगरपंचायतीवर आता शिवसेनेचा भगवा फडकत आहे. सोयगाव नगरपंचायतीत १७ सदस्यांपैकी ११ सदस्य शिवसेनेचे होते. तर भाजपला केवळ ६ जागांवर समाधान मानावे लागले होते. आता या ६ जागांपैकी ४ जणांनी देखील भाजपला कायमचा रामराम ठोकला आहे.

यामध्ये वॉर्ड क्रमांक ५ येथील वर्षा घनगांव, वॉर्ड क्रमांक ११ मधील संदीप सुरडकर, वॉर्ड क्रमांक १३ मधील ममताबाई इंगळे, वाॅर्ड क्रमांक १४ येथील आशियाना शाह यांचा समावेश आहे. त्यामुळे कधी काळी भाजपच्या ताब्यात असलेल्या सोयगाव नगरपंचायतीत आता त्यांच्याकडे केवळ दोन सदस्य शिल्लक असल्याने रावसाहेब दानवे यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. नगरपंचायतीच्या विजयानंतर अब्दुल सत्तारांनी खेळी खेळण्यास सुरुवात केली होती. आणि त्याचे परिणाम आता पहायला मिळत आहेत.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!