Share

पुण्यातील शाळा-कॉलेज १ फेब्रुवारीपासून सुरु; उपमुख्यमंत्र्यांची माहिती

Published On: 

🕒 1 min read

पुणे: कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे पुण्यातील शाळा-कॉलेज बंद ठेवण्यात आल्या होत्या. मात्र आता १ फेब्रुवारीपासून शाळा-कॉलेज सुरु केले जाणार (Schools and colleges in Pune starting from 1st February)असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार ( Deputy Chief Minister Ajit Pawar) यांनी केली आहे. पहिली ते आठवीच्या शाळा सुरुवातीला चार तासच सुरु ठेवण्यात येणार आहेत. त्यानंतर आढावा घेऊन पुढील निर्णय घेण्यात येणार आहेत.

तसेच नववीपासून पुढील वर्ग पूर्णवेळ सुरु ठेवण्यात येणार आहेत. यासाठी मुलांनी कोरोना प्रतिबंधकचे दोन्ही डोस घेणे बंधनकारक असणार आहे. १५ ते 18 वयोगटातील विद्यार्थ्यांनी लसीकरण घेणे आवश्यक आहे. सध्या पुण्यातील ग्रामीण भागात ८६ टक्के लसीकरण झाले असून पुणे शहरात ९० टक्के लसीकरण झाले आहे. मात्र ज्या विद्यार्थ्यांचे लसीकरण झाले नाही अशांसाठी शाळा आणि कॉलेजमध्येच लसीकरणासाठी वेगळी कक्षा करण्यात येणार आहे.

दरम्यान आम्ही जरी निर्णय घेतला असला, तरी विद्यार्थ्यांबाबत अंतिम निर्णय पालकांनी घ्यायचा आहे. असे अजित पवार यांनी म्हटले आहे. तसेच लसीकरणासाठी मोबाईल व्हॅनचीही सुविधा करण्यात आल्याचे अजित पवार यांनी म्हटले आहे. यावेळी त्यांनी मास्कमुक्त महाराष्ट्रबाबत केल्या जाणाऱ्या चर्चाबाबतही प्रतिक्रिया दिली आहे. मंत्रिमंडळ बैठकीत मास्क लावायचा नाही अशी चर्चा झाली, हे धादांत खोटे आहे. माध्यमांनी याबाबत योग्य माहिती घ्यावी. बाहेरच्या देशांनी असा निर्णय घेतला असेल पण राज्याने याबाबत चर्चाही केलेली नाही, असे अजित पवार यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!