Share

“मुख्यमंत्री ठाकरेंना घेऊन ‘क्रांतिवीर’ पार्ट -2 काढता येईल”, भातखळकरांचा हल्लाबोल

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : महाराष्ट्रात किराणा दुकान आणि सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीसाठी (Wine Sale) उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जे सुपर मार्केट एक हजार स्क्वेअर फुटाच्यावर आहे. तिथे एक स्टॉल टाकून वाईन विक्रीला मुभा देण्यात येणार आहे. ठाकरे सरकारच्या (Thackeray Government) या निर्णयानंतर भाजप नेत्यांकडून मोठ्या प्रमाणात टीका करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप नेते अतुल भातखळकर(Atul Bhatkhalkar) यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला आहे. तसेच मुख्यमंत्री ठाकरेंना घेऊन ‘क्रांतिवीर’ पार्ट -2 काढता येईल, असा खोचक टोलाही भातखळकरांनी लगावला आहे.

यासंदर्भात अतुल भातखळकर यांनी ट्विट केले असून ट्विटमध्ये ते म्हणाले आहेत की,‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) यांना घेऊन ‘क्रांतिवीर’ पार्ट-2 काढता येईल. त्यांनी महाराष्ट्रात मद्यक्रांती घडवली आहे.’ तसेच शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी येत्या काळात अफू आणि गांजाच्या शेतीबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे, असेही भातखळकर म्हणाले आहेत.

दरम्यान, भाजपकडून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस(Devendra Fadanvis), भाजप नेत्या चित्रा वाघ(Chitra Wagh), विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर(Pravin Darekar) तसेच भाजप नेते चंद्रकांत पाटील(Chandrakant Patil) यांनी ठाकरे सरकारच्या निर्णयावरून जोरदार टीका केली आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!