मुंबई: राज्यसरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीत वाईन विक्रीचा (Wine Sale) प्रस्ताव मंजूर केला आहे. या निर्णयानुसार वाईन आता जनरल स्टोअर तसेच सुपर मार्केटमध्ये (Wine sales in supermarkets)देखील विक्रीसाठी ठेवण्यात येणार आहे. राज्यसरकारच्या या निर्णयावर भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे. भाजपने जोरदार टीकेची झोड उठवली असतानाच आता राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे (NCP leader Rupali Patil Thombre) यांनी भाजपला खोचक सवाल करत टोला लगावला आहे.
“सत्तापिपासू भाजपला वाईन व दारुतला फरक माहीत नाही का? असा सवाल करत सत्ता गेल्यापासून व पुन्हा सत्तेत येऊ शकत नाहीत म्हणून भांबावल्यागत झालेल्या भाजपा नेत्या मध्ये २०२४ ला विरोधीपक्षनेते होण्यासाठी एकमेकांत स्पर्धा चालू झाली आहे.” , असे ट्वीट रुपाली पाटील ठोंबरे यांनी केले आहे.
सत्तापिपासू भाजपला वाईन व दारुतला फरक माहीत नाही का? सत्ता गेल्यापासून व पुन्हा सत्तेत येऊ शकत नाहीत म्हणून भांबावल्यागत झालेल्या भाजपा नेत्या मध्ये 2024 ला विरोधीपक्षनेते होण्यासाठी एकमेकात स्पर्धा चालू झाली आहे ..@MHD_Press @lokmat @thodkyat
— Rupali patil thombare (@Rupalispeak) January 28, 2022
दरम्यान भाजपकडून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजप नेत्या चित्रा वाघ, विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर तसेच अतुल भातखळकर यांनी महाविकास आघाडी सरकारच्या निर्णयावरून जोरदार टीका केली आहे. तर भाजपनंतर सांभाजी भिडे यांनी देखील ठाकरे सरकारच्या या निर्णयाचा निषेध केला आहे. सांभाजी भिडे (Sambhaji Bhide) पत्रकारांशी संवाद साधत असताना म्हणाले, या देशातील सर्व दारू संपली पाहिजे. गांजा शेतीच्या का आडवे पडायचे. चरस गांजा उत्पन्न करण्यासाठी हा समाज पुढे येईल. या प्रकरणी मुख्यमंत्री आणि पूर्ण मंत्रिमंडळात बोलणार आहे. त्यामुळे या निर्णयामुळे आता पुन्हा एकदा भाजप विरुद्ध महाविकास आघाडी असा संघर्ष आता निर्माण झाला आहे.
महत्वाच्या बातम्या:
- “राज्यातील भाजप देशी नवसारीची दारू प्यायल्याप्रमाणे बरळू लागलायं ”, राऊतांचे टीकास्त्र
- ‘शूटर दादी’ च्या स्मरणार्थ युपी सरकार बनवणार ‘शूटिंग रेंज’
- महाराष्ट्र ‘मद्यराष्ट्र’ होईल असे बरळणे हे झिंगलेल्या मनोवृत्तीचे लक्षण- संजय राऊत
- ‘सगळ्यांच्या विरोधात जाऊन त्यांनी…’; संभाजी भिडेंनी सांगितला आर.आर. पाटलांचा किस्सा
- संभाजी भिडेंनी केली पंतप्रधानांकडे दारू बंदीची मागणी


