Share

“साधा मलंगगडचा प्रश्न यांच्याने सुटत नाही आणि हिंदुत्वाच्या गप्पा करतात”, फडणवीसांचा शिवसेनेला अप्रत्यक्ष टोला

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त काल शिवसैनिकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी हिंदुत्वावरून भाजपला चांगलेच धारेवर धरले. भाजपने सत्तेसाठी हिंदुत्वाचा वापर केला. सत्तेसाठी हिंदुत्वाचा वापर करणे म्हणजे हिंदुत्व नाही. भाजपने आमच्याकडून गुलामांसारखे वागण्याची आस ठेवली. मात्र आम्ही झुकलो नाही. आम्ही काँग्रेस, राष्ट्रवादीशी युती केली. त्यामुळे आम्ही भाजप सोडला पण हिंदुत्व सोडणार नाही. भाजप हे हिंदुत्व नाही. अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली. यावरूनच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनीही मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंना (Uddhav Thackeray) अप्रत्यक्ष टोला लगावला आहे.

“ना औरंगाबादचे संभाजीनगर झाले. ना उस्मानाबादचे धाराशिव झाले. साधा मलंगगडचा प्रश्न यांच्याने सुटत नाही आणि हिंदुत्वाच्या गप्पा करतात.” ,असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे. दरम्यान हिंदुत्वावरूनच भाजप नेते राम कदम यांनीही शिवसेनेला डिवचले आहे.

“हिंदुत्वावर व्याख्यान देण्यापूर्वी उद्धव ठाकरे यांनी आत्मपरीक्षण करावे की, शिवसेना दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारसरणीचे अनुसरण करते का, ज्यांनी म्हटले होते की त्यांचा पक्ष राजकारणात आणि जीवनात कधीही काँग्रेसमध्ये सामील होणार नाही आणि अशी परिस्थिती उद्भवल्यास ते पक्षाला टाळे ठोकण्यास प्राधान्य देतील.” असे राम कदम (Ram Kadam) यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!