🕒 1 min read
मुंबई: राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे (NCP MP Amol Kolhe) यांच्या ‘व्हाय आय किल्ड गांधी’ या चित्रपटावरुन आता नवा वाद रंगला आहे. खासदार अमोल कोल्हे यांनी या चित्रपटामध्ये नथुराम गोडसेची भूमिका साकारल्याने वाद निर्माण झाला आहे. नथुराम गोडसे यांची भूमिका साकारल्याने त्यांच्यावर सर्वच स्तरातून टीका केली जात आहे. तर भाजपने आता राष्ट्रवादीने आपल्या पक्षाची भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी केली आहे. तर भाजप नेते अतुल भातखळकर(Atul Bhatkhalkar) यांनी थेट राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर निशाणा साधला आहे.
“राष्ट्रवादी पक्षाला कोणतेही धोरण नाही, किंवा विचार नाही. शरद पवारांच्या आयुष्याचे धोरण फक्त सत्तेत राहणे एवढेच आहे. ज्या छगन भुजबळ यांनी एकेकाळी महात्मा गांधी यांचे पुतळे उखडून टाका आणि नथुराम यांचे पुतळे लावा, असे म्हटले होते त्या छगन भुजबळ यांना शरद पवारांनी काँग्रेसमध्ये बोलावून घेतले. त्यामुळे राष्ट्रवादी त्यांच्या धोरणाशी सुसंगतच आहे. फक्त एकीकडे महात्मा गांधींच्या विचारसरणीवर कौतुकाने बोलायचे आणि दुसरीकडे स्वतःच्या पक्षातील खासदार नथूरामची भूमिका साकारत आहे, त्यालाही राष्ट्रवादी पाठींबा देत आहे. त्यामुळे राष्ट्रवादीची कोणतीही विचारशैली किंवा धोरण नाही. राष्ट्रवादीचे महात्मा गांधींवरील प्रेम फक्त ढोंगीपणा आहे. असे अतुल भातखळकर यांनी म्हटले आहे.
अमोल कोल्हे यांच्या कोलांट्या, NCP च्या आणि @PawarSpeaks यांच्या कोलांटीवादी धोरणाशी सुसंगत. pic.twitter.com/tQ2RdhucMB
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) January 21, 2022
अमोल कोल्हे यांची प्रतिक्रिया-
२०१७ साली या चित्रपटाचे चित्रीकरण झाले होते. ज्यावेळी कोणत्याही सक्रिय राजकारणात नसताना मी ही भूमिका साकारली होती. एखादी भूमिका करतो म्हणजे त्या विचारधारेसोबत सहमत असतो असे कलाकार म्हणून कधीच नसते. काही विचारांसोबत आपण सहमत असतो. तर काही विचारधारांसोबत सहमत नसतानाही आपण ती भूमिका करतो. माझ्या व्यक्तिगत आणि सार्वजनिक आयुष्यातसुद्धा नथुराम गोडसेचे उदात्तीकरणाच्या संदर्भात मी कधीही भूमिका घेतलेली नाही. केवळ एक कलाकार म्हणून भूमिका साकारणे आणि त्याचा राजकीय विचारांसोबत संबंध जोडला जाणे या दोन विभिन्न गोष्टी आहेत. असे अमोल कोल्हे यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या:
- अमोल कोल्हेंनी साकारलेल्या गोडसेंच्या भूमिकेवरून वाद; तुषार गांधींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
- पंतप्रधान पदाचा अवमान करणाऱ्या चंद्रकांत पाटील, बावनकुळे यांच्या विरोधात गुन्हे दाखल करा; काँग्रेसची मागणी!
- “अभिनेता कोणाचीही भूमिका करु शकतो मग ती अफझल खानाचीही…”, चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया
- लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत उद्धव ठाकरेंनी पटकावले चौथे स्थान
- “झेब्रा क्रॉसिंग नीट रंगवायला अक्कल लागते का?”, मनसेचा मुख्यमंत्री ठाकरेंना अप्रत्यक्ष टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
