Share

अमोल कोल्हेंनी साकारलेल्या गोडसेंच्या भूमिकेवरून वाद; तुषार गांधींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे (NCP MP Amol Kolhe) यांच्या ‘व्हाय आय किल्ड गांधी’ या चित्रपटावरुन आता नव्या वादाला सुरुवात झाल्याचे चित्र बघायला मिळत आहे. तसेच कोल्हे यांनी या चित्रपटामध्ये नथुराम गोडसेची भूमिका साकारल्याने वाद निर्माण झाला असून या भूमिकेवरून त्यांच्यावर सर्वच स्तरातून टीका केली जात आहे. असे असतांनाच कलावंत म्हणून अमोल कोल्हेंनी जी भूमिका साकारली त्याला माझा कोणताही आक्षेप नाही, अशी प्रतिक्रिया गांधीजींचे पणतू तुषार गांधी यांनी दिली आहे.

यासंदर्भात प्रसार माध्यमांशी संवाद साधत असतांना तुषार गांधी म्हणाले की,’अमोल कोल्हेंनी जी भूमिका केली आहे ती अभिनेता म्हणून केली आहे. तसेच जर त्यांना नथुराम गोडसे आवडत असेल तर त्यांना तेही स्वातंत्र्य आहे. त्यामुळे कलावंत म्हणून अमोल कोल्हे यांनी जी भूमिका केली त्याला माझा कोणताही आक्षेप नाही. परंतु, एका खुन्याचे उदात्तीकरण करण्याचा जो काही प्रयत्न आहे त्याचा निषेध करायला हवा.’ तसेच बापूंना बदनाम करण्याचे आणि नथुरामचे उदात्तीकरण करण्याचे कितीही प्रयत्न केले तरी ७० वर्षांनंतरही बापूंच्या कामाचं महत्त्व कायम आहे हे आपण पाहतोय, असेही तुषार म्हणाले आहेत.

दरम्यान, याप्रकरणी राष्ट्रवादी पक्षाचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी अमोल कोल्हेंची बाजू घेतली असून यासंदर्भात ट्विट करत ते म्हणाले आहेत की,’खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी आव्हानात्मक भुमिका साकारली. एक अभिनेता म्हणुन त्यांनी नथुराम ची भुमिका पार पाडली असेल याचा अर्थ त्याचे समर्थन केले असे नाही. रामायणात त्रिवेदी यांनी रावणाची साकारलेली भुमिका आठवा प्रत्यक्षात मात्र ते रामभक्त होते हे वास्तव आहे.’

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!