🕒 1 min read
मुंबई : छोटयापडद्यावरील बिग बॉस (Bigg Boss) हा टीव्ही शो सर्वाधिक वादग्रस्त तसेच मनोरंजक आहे. मात्र बिग बॉस १५ भांडण आणि वादासाठी अधिक लोकप्रिय ठरत आहे. चांगल्या मैत्रिणी म्हणून ओळखल्या रश्मि देसाईनं (Rashmi Desai) देवोलिनाचा (Devolina Bhattacharjee) वाद शिगेला पोहंचलेला दिसत आहे.
दरम्यान बिग बॉस १५ चा नवा प्रोमो सध्या सोशल मीडियावर (social media) बराच चर्चेत आहे. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे रश्मि आणि देवोलिना यांच्यात टास्कमध्ये झालेलं भांडण. ‘तिकिट टू फिनाले’ (‘Ticket to Finale’ task) हा टास्क जिंकण्याच्या नादात रश्मि आणि देवोलिना यांना त्यांच्या मैत्रीचाही विसर पडलेला दिसत आहे. एवढंच नाही तर टास्क जिंकण्यासाठी या दोघी एकमेकांशी भांडताना आणि मारामारी करताना दिसल्या. हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे.
घरातील सदस्यांसाठी व्हीआयपी झोनमध्ये जागा मिळवण्यासाठी ही शेवटची संधी आहे. रश्मि आणि देवोलिनापैकी कोणालाच ही संधी गमवायची नाही. दोघीही राखीला आपापल्या बाजूनं निर्णय देण्यास सांगतात. पण राखी त्या दोघींमध्ये भांडण लावण्याचं काम करते. विशेष म्हणजे राखी यात यशस्वी होते. रश्मि आणि देवोलिनामध्ये जोरदार भांडण झाल्याचं नुकत्याच प्रदर्शित झालेल्या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे.
https://www.instagram.com/tv/CY8HdvTlfge/?utm_source=ig_web_copy_link
एवढं नाही तर या दोघांचं भांडण पुढे जाऊन एवढं वाढतं की रश्मि रागाच्या भरात देवोलिनाच्या कानशिलात लगावते. सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरताना दिसत आहे. आता बिग बॉस रश्मिच्या या वर्तनावर तिला काय शिक्षा देतात याबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे.
महत्वाच्या बातम्या:
-
बांग्लादेशीय अभिनेत्री प्रकरण: पोलिसांनी एका पुराव्याच्या आधारे २४ तासात केली अटक
-
‘राष्ट्रवादी आणि शिवसेनेचं जमतंय, ही गोष्ट भाजपला पचत नाही’; नवाब मलिकांचे वक्तव्यं
-
स्टार प्रवाहचे सतीश राजवाडे, किरण माने यांच्यासोबतच्या भेटीनंतर आव्हाडांची प्रतिक्रिया, म्हणाले
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
