औरंगाबाद: शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय प्रवेशद्वाराजवळील फुटपाथवर पुन्हा पक्क्या विटांचे बांधकाम तयार करण्यात आले आहे. अपंग व्यक्तींच्या नावाखाली काही राजकीय पुढाऱ्यांनी फुटपाथवर अतिक्रमण केले आहे. फुटपाथवर असे अतिक्रमण होत असतांनाही मनपा अधिकाऱ्यांनी मात्र याकडे कानाडोळा केला आहे. याआधीही घाटी परिसरातील अशा प्रकारचे अनेक अतिक्रमणे तोडण्यात आली होती. मात्र परिस्थिती पुन्हा जैसे थे झाली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय अर्थात घाटी हे मराठवाडा व शेजारच्या जिल्ह्यातील नागरिकांसाठी सर्वात मोठे शासकीय रूग्णालय आहे. रूग्णालयामध्ये प्रवेश करण्यासाठीच्या दोन्ही प्रवेशद्वारांवर फेरीवाले, हातगाडीवाल्यांनी अनधिकृत कब्जा मिळविला आहे. यातच अपंगांच्या नावाखाली फुटपाथच्या जमीनी हडप करून त्यावर दुकाने काढण्याची टोळी सक्रीय झाली आहे. महिना भरापूर्वी फुटपाथवर पक्क्या विटांचे बांधकाम करण्याचा प्रयत्न झाला.
यासंदर्भात तक्रारी आल्यानंतर मनपा आयुक्त आस्तिक कुमार पांडेय यांनी अतिक्रमण पाडण्याचे आदेश देऊन अनधिकृतणे बांधलेली दुकाने पाडली. परंतु, सध्या पुन्हा त्याच जागेवर पक्क्या विटांचे बांधकाम करून दोन दुकान सुरू करण्यात येत आहेत. राजकीय पुढाऱ्यांच्या दबावाबरोबरच पैशांची देवाणघेवाण करून मनपातील अधिकारी, कर्मचारी हे अतिक्रमणास प्रोत्साहन देत असल्याची चर्चा घाटी वर्तुळात सुरू आहे़. अशा परवानग्या सर्वांनाच दिल्या तर परिसरातील फुटपाथवर माफियांची दहशत निर्माण होईल, अशी चर्चाही रंगत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
-
“उत्पल पर्रीकरांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढवल्यास आमचा पाठींबा”,संजय राऊतांचा मोठा दावा
-
राज्यात महाविकासआघाडीने केला भाजपचा सुपडा साफ; रोहित पवारांची रोखठोक पोस्ट
-
धक्कादायक! साताऱ्यात माजी सरपंचाने केली गरोदर वनरक्षक महिलेला मारहाण
-
“आमचा सातारचा वाघ घरी बसनार्यातला नाय…”, किरण मानेंची ‘या’ चित्रपटात लागली वर्णी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
