Share

स्टार प्रवाहचे सतीश राजवाडे, किरण माने यांच्यासोबतच्या भेटीनंतर आव्हाडांची प्रतिक्रिया, म्हणाले

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: ‘टेलिव्हिजनवरील ‘मुलगी झाली हो’ (Mulgi zali ho marathi Serial) या मालिकेतील कलाकार किरण माने (Kiran mane) हे काही दिवसांपासून चर्चेत आहेत. सध्या या प्रकरणामध्ये एक नवीन घडामोड दिसून आली आहे. अभिनेते किरण माने आणि स्टार प्रवाहचे कंटेंट हेड सतीश राजवाडे (Satish Rajwade) हे दोघेही गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (NCP Minister Jitendra Awhad) यांच्या भेटीला गेले होते. खासदार अमोल कोल्हे (NCP MP and artist Amol Kolhe) हे देखील या बैठकीदरम्यान उपस्थित होते.

दरम्यान किरण माने (Kiran Mane) यांनी सोशल मीडियावरुन वेगवेगळ्या पोस्ट लिहल्या. आता स्टार प्रवाहचे कंटेंट हेड सतीश राजवाडे हे दोघेही गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या भेटीला गेले होते. खासदार अमोल कोल्हे हे देखील या बैठकीदरम्यान उपस्थित होते. या भेटीनंतर जितेंद्र आव्हाड यांनी आपलं मत मांडलं असून त्यांनी म्हटलं आहे की, किरण माने प्रकरणात स्टार प्रवाहचे सतीश राजवाडे यांच्यासोबत चर्चा केली आहे. आम्ही त्यांना विचारलं की किरण माने यांना याआधी नोटीस दिली होती का? एखाद्या कलाकाराला याप्रकारे बाहेर काढणं हे माणुसकीच्या विरोधातली घटना आहे, असं मला वाटतं.

पुढे ते म्हणाले की, सर्व स्त्री कलाकारांनी किरण माने यांची बाजू घेतली आहे. स्टार प्रवाहचे प्रॉडक्शन हाऊसचे लोक येऊन मला भेटणार आहेत. एका स्त्रीने त्यांच्यावर आरोप केला मात्र बाकीच्या महिला कलाकारांनी त्यांची बाजू घेतली आहे. तसं दिसूनही येतंय. पुढे त्यांनी प्रश्न केलाय की, प्रॉडक्शन हाऊसने त्यांना कधी सांगितले होते का? एक चांगली मालिका बंद होऊ नये, एवढीच आमची इच्छा आहे.

Kiran Mane Mulgi Zali ho

आव्हाड पुढे म्हणाले की, मी एकदा भूमिका घेतली त्यातून मी पाय मागे घेत नाहीय. हा वैचारिक लढा नाहीये. हा राजकीय अभिनिवेश नाहीय. किरण माने हे प्रकरण माझ्यापर्यत आले म्हणून मी त्यांची बाजू घेतली आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं. एका प्रॉडक्शन हाऊस विरुद्ध महिला कलाकाराने किरण माने याची बाजू घेतली या खऱ्या जिजाऊंच्या लेकी आहेत, असं म्हणत त्यांनी किरण मानेंची बाजू घेणाऱ्या कलाकारांचं कौतुकही केलं आहे. आता या मानें प्रकरणातील नव्या वळणामुळे जोरदार चर्चा होत आहे.

 

महत्वाच्या बातम्या:

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!