🕒 1 min read
मुंबई: नेव्हल डॉकयार्ड मुंबई येथे INS रणवीरच्या (INS Ranveer Blast) युद्धनौकेत मोठा स्फोट झाला आहे, झालेल्या स्फोटात तीन भारतीय नौदलाच्या जवानांना आपला जीव गमवावा लागला असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच तात्काळ प्रतिसाद देत नौकेवरील इतर उपस्थित कर्मचाऱ्यांनी या युद्ध नौकेवरील परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला.
आयएनएस रणवीर (INS Ranveer Blast) ईस्टर्न नेव्हल कमांडकडून क्रॉस कोस्ट ऑपरेशनल तैनातीवर होते आणि ते लवकरच बेस पोर्टवर परतणार होते, त्यावेळी ही घटना घडल्याचे निदर्शनास आल्याचे भारतीय नौदलाच्या (Indian Navy) अधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे. मात्र या स्फोटाचे कारण अद्याप अस्पष्ट असल्याने हा स्फोट नेमका कशामुळे झाला याचे कारण अजून उलगडले नाही.
या स्फोटात तीन जवान शहीद झाले असून इतर कर्मचारी जखमी झाले आहेत. मृत सैनिकांची ओळख अद्याप पटलेली नाही. स्थानिक नौदल रुग्णालयात जखमी झालेल्या ११ जणांवर उपचार सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. स्फोटाचे कारण अद्याप अस्पष्ट आहे, मात्र याबाबत चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.
महत्वाच्या बातम्या:
-
‘नाना पटोलेंवर कारवाई झाली नाही तर…’; भाजप शिष्टमंडळांचं राज्यपालांना निवेदन
-
‘मोदींच्या हत्येच्या कटाला राहुल गांधींची सहमती?’; चित्रा वाघ यांचा सवाल
-
अक्षयचा ‘बच्चन पांडे’ चित्रपट होणार चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित; जाणून घ्या तारीख
-
‘नाना पटोलेंची जीभ छाटा १ लाख मिळवा’; भाजप नेत्याने दिली धमकी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
