Share

“नामफलक मराठीतच असावेत याचे श्रेय फक्त महाराष्ट्र सैनिकालाच बाकी कुणीही आचरटपणा करू नये”

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : मराठी भाषा आणि मराठी अस्मिता टिकवण्यासाठी आता राज्य सरकारने आता मोठा आणि महत्वाचा निर्णय घेतला असून यापुढे सर्व दुकानांवरच्या पाट्या या मराठी भाषेतच करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर मनसेप्रमुख राज ठाकरेंनी(Raj Thackeray) राज्य सरकारच्या या निर्णयाला पाठिंबा देत अभिनंदन केले आहे.

यासंदर्भात राज ठाकरेंनी ट्विट केले असून ते म्हणाले आहेत की,’ह्या महाराष्ट्रात दुकानांवर मराठीतच पाट्या असाव्यात ह्यासाठी खरंतर आंदोलन करावं लागूच नये, परंतु २००८, २००९ साली पाट्या मराठीतच असाव्यात म्हणून महाराष्ट्र सैनिकांनी महाराष्ट्र जागवला, आंदोलनं केली, शेकडोंनी केसेस अंगावर घेतल्या आणि शिक्षा भोगल्या. काल महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळानं दुकानांवरील नामफलक मराठीतच असावेत असा निर्णय घेतला तेंव्हा त्याचं श्रेय हे फक्त आणि फक्त माझ्या महाराष्ट्र सैनिकांचं आहे. त्या सर्वांचं मनःपूर्वक अभिनंदन. बाकी कुणीही हे श्रेय लाटण्याचा आचरटपणा करू नये. त्यावर अधिकार आहे फक्त महाराष्ट्र सैनिकाचाच.’

दरम्यान, पुढे ते म्हणाले की,’महाराष्ट्र सरकारला आता मी इतकंच सांगेन की आता कच खाऊ नका, ह्याची अंमलबजावणी नीट करा. यामध्ये आणखी एक भानगड सरकारनं करून ठेवली आहे की मराठी भाषेशिवायही इतर भाषा नामफलकांवर चालतील म्हणून. ह्याची काय गरज आहे? महाराष्ट्राची भाषा देवनागरीतील मराठी आहे, देवनागरी लिपी सर्वांना समजते. इथे फक्त मराठीच चालणार आणि ह्याची आठवण पुन्हा-पुन्हा आम्हाला करायला लावू नका’, असेही ठाकरे म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!