🕒 1 min read
मुंबई : रयत शिक्षण संस्था आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार(Sharad Pawar) यांच्यावरून राजकीय नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचे सामने बघायला मिळत आहे. साताऱ्यात शिवसेना आमदार महेश शिंदे(Mahesh Shinde) यांनी माझी उंची शरद पवारांची उंचीपेक्षा दोन इंच लहान आहे असे म्हंटले होते. यावरून राष्ट्रवादी काँग्रसचे नेते जितेंद्र आव्हाड(Jitendra Awhad) यांनी महेश शिंदेंनी आपला मेंदु तपासून पाहावा असे म्हंटले. दरम्यान,आता या वादात भाजप नेत्यांनी देखील उडी मारली असून भाजप नेते अतुल भातखळकर यांनी शरद पवारांवर निशाणा साधत खोचक टोला लगावला आहे.
यासंदर्भात भातखळकरांनी ट्विट केले असून ट्विटमध्ये ते म्हणाले आहेत की,’बाळासाहेबांनी उंची व्यवस्थित मोजली होती.’ तसेच या ट्विटसोबत त्यांनी सामना वृत्तपत्राच्या जुन्या अंकाचा फोटो टाकला आहे. यामध्ये बाबासाहेब ठाकरेंच्या सभेचा फोटो असून ‘निश्चयाचा महामेरु कसले, पवार तर सोनियांचे पायधरू’,असे या बातमीचे शीर्षक आहे.
बाळासाहेबांनी उंची व्यवस्थित
मोजली होती… pic.twitter.com/3sImqtgqWg— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) January 12, 2022
दरम्यान, भातखळकरांनी अजून एक ट्विट केले असून यामधून त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला आहे. ते म्हणाले आहेत की,’घरी बसण्याचा निकष लावला तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सर्वात मोठे आहेत. त्यांची कुणाशी तुलनाच होऊ शकत नाही. कुंभकर्णसुद्धा सहा महिन्यांनी जागा व्हायचा, हे कुणी तरी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना सांगण्याची गरज आहे.’
महत्वाच्या बातम्या:
- अनिल देशमुखांच्या शंभर कोटी बाबत पोलिस उपायुक्तांनीच दिले उत्तर, म्हणाले…
- कोरोनामुक्त होताच रोहित पवार मैदानात; साधला भाजपवर निशाणा
- ‘मेहता पब्लिशिंग हाऊस’चे सुनिल मेहता यांचे निधन
- “आपल्याला कोरोना झाला नाही कारण…”; इंदुरीकर महाराजांचे अजब विधान
- अजय देवगणने स्वतःला लिहिलं पत्र ; म्हणाला, “अभिनेता म्हणून अपयशी..”
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
