Share

ज्येष्ठ अभिनेत्री रेखा कामत काळाच्या पडद्याआड; त्यांच्या जाण्याने कलाविश्वात मोठी पोकळी निर्माण झाली

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : मराठी कलाविश्वातील ज्येष्ठ अभिनेत्री रेखा कामत (Rekha Kamat) यांचं निधन (passed away) झालं आहे. त्या ८९ वर्षाच्या होत्या. वृध्दापकाळामुळे रेखा कामत यांची प्राणज्योत मालवली असून मुंबईतील माहिम इथल्या निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या ६० वर्षांपेक्षा अधिक काळ त्या कलाविश्वात सक्रीय होत्या. नाटक, मालिका, चित्रपट अशा विविध माध्यमातून रेखा कामत यांनी प्रेक्षकांचं मनोरंजन केलं होतं. त्यांनी साकारलेल्या भूमिका विशेष गाजल्या असून त्यांच्या निधनामुळे कलाविश्वात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

अभिनेत्री रेखा चित्रपट लेखक ग. रा. कामत यांच्याशी विवाह केला. रेखा कामत आणि चित्रा नवाथे या दोघी सख्ख्या बहिणी असून दोघींनी मराठी चित्रपटसृष्टीचा सुवर्णकाळ गाजविला. मालिकांमध्ये ही त्यांनी काम केले. प्रतिमा कुलकर्णी दिग्दर्शित ‘प्रपंच’ ही त्यांची पहिली मालिका. या मालिकेत त्यांनी साकारलेली ‘आक्का’ ही भूमिका विशेष ठरली. ‘सांजसावल्या’, ‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’मध्ये ‘माई आजी’ ने तर भरपूर प्रसिध्दी मिळाली. त्या अनेक जाहिरातींमधूनही त्यांनी ‘आजी’ची भूमिका साकारली आहे. चित्रपट, नाटक, मालिका, जाहिराती अभिनयाच्या या चारही क्षेत्रांत त्यांनी भरपूर काम केलं असलं तरी नाटककडे त्यांचा अधिक कल होता.

‘लाखाची गोष्ट’ हा रेखा यांचा पहिला चित्रपट. त्यात राजा परांजपे, ग. दि माडगूळकर आणि सुधीर फटके हे सहकलाकार होते. कुमुद आणि कुसुम ही जुन्या वळणाची नावं नकोत, चित्रपटासाठी जरा आकर्षक नावं पाहिजेत म्हणून ‘गदिमां’ नी रेखा आणि चित्रा असं नामकरण केल्याचं, त्यांनी एका मुलाखतीत हा किस्सा शेअर केला होता. पुढे या नावानेच त्यांनी मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केलं होतं.

रेखा यांनी ‘कुबेराचे धन’, ‘गृहदेवता’ (यात त्यांची दुहेरी भूमिका होती), ‘गंगेत घोडे न्हाले’, ‘मी तुळस तुझ्या अंगणी’, ‘माझी जमीन’ तर अगदी अलीकडचा ‘अगंबाई अरेच्चा’ हे त्यांचे गाजलेले चित्रपट. ‘नेताजी पालकर’ चित्रपटात त्यांनी एक लावणी नृत्य तर ‘जगाच्या पाठीवर’ चित्रपटात बैठकीची लावणीही सादर केली. व्यावसायिक मराठी रंगभूमीवरही रेखा यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. ‘सौभद्र’, ‘एकच प्याला’, ‘भावबंधन’, ‘संशयकल्लोळ’ आदी संगीत नाटकांतून तसेच ‘दिल्या घरी तू सुखी राहा’, ‘तुझं आहे तुजपाशी’, ‘लग्नाची बेडी’, ‘तरुण तुर्क म्हातारे अर्क’, ‘प्रेमाच्या गावा जावे’, ‘गोष्ट जन्मांतरीची’, ‘दिवा जळू दे सारी रात’, ‘कालचक्र’ आदी व्यावसायिक नाटकांतून त्यांनी भारदस्त भूमिका साकारल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!